शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाचा समद्धी फौंडेशनतर्फे सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 17:53 IST

विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे उद्योगात परिवर्तन करण्यासाठी त्यांना पाठबळ, प्रोत्साहन देणे व मार्गदर्शन करणे, यासाठी शिवाजी विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग आणि सांगली येथील समृद्धी टीबीआय फौंडेशन यांच्यादरम्यान मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाचा समद्धी फौंडेशनतर्फे सामंजस्य करारविद्यार्थ्यांच्या कल्पनांचे उद्योजकीय परिवर्तन करण्यासाठी प्रोत्साहन

कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे उद्योगात परिवर्तन करण्यासाठी त्यांना पाठबळ, प्रोत्साहन देणे व मार्गदर्शन करणे, यासाठी शिवाजी विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग आणि सांगली येथील समृद्धी टीबीआय फौंडेशन यांच्यादरम्यान मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला.शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी, डॉ. एस. बी. काळे, डॉ. एस. डी. डेळेकर, समृद्धी फौंडेशनच्या संस्थापक सहसंचालक रेणुका पाटील आणि ज्योती यादव यांच्या उपस्थितीत कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि समृद्धी फौंडेशनचे संस्थापक संचालक मनीष पाटील यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.या सुविधेमुळे कौशल्य विकास अध्यापनशास्त्राद्वारे रोजगार निर्मिती आणि कुशल उद्योजक निर्माण होणे शक्य होईल. अभियांत्रिकीसह नवसंकल्पनांचे आविष्करण करण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही यामुळे संधीचे एक महत्त्वाचे द्वार खुले होत आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.या कराराअंतर्गत सिंगापूर येथील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, चीनमधील फुदान विद्यापीठ व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्था यांच्या समन्वयातून हा नवसंकल्पनांच्या उद्योजकीय परिवर्तनाचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी निर्माण करणारे कुशल तंत्रज्ञ तयार झाले पाहिजेत, या अनुषंगाने ‘जुगाडफंडा डॉट कॉम’ या वेबसाईटमार्फत हा उपक्रम समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यामध्ये सर्व क्षेत्रांतील विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना प्रोत्साहन देऊन नवउद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे मनीष पाटील यांनी यावेळी सांगितले. विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग यासाठी अधिकृत केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहे. ‘जुगाडफंडा डॉट कॉम’ या आयटी पोर्टल प्लॅटफॉर्ममार्फत विद्यार्थ्यांना अधिकृत केंद्राशी संपर्क साधता येणार आहे.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर