शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

सदस्यांनी ‘व्हिजन’ ठेवून काम करावे : चंद्रकांतदादा पाटील-- शिवाजी विद्यापीठात विकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 02:13 IST

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवर निवडून गेलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी विद्यापीठ विकासाबाबत एक आराखडा तयार करावा,

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवर निवडून गेलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी विद्यापीठ विकासाबाबत एक आराखडा तयार करावा, त्याबाबत नवे ‘व्हिजन’ डोळ्यासमोर ठेवून भविष्यातील कामकाजाची वाटचाल करावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीमध्ये प्राचार्य, नोंदणीकृत पदवीधर, विद्यापीठ शिक्षक, संस्थाचालक, अभ्यास मंडळे आणि शिक्षक अधिसभा यात विकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचा तसेच अधिकार मंडळावर राज्यपाल नियुक्त सदस्यांचा सत्कार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी येथील एका हॉटेलच्या हिरवळीवर पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील हे होते.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठातील विविध अधिकार मंडळाच्या निवडणुकीत सर्वांनी एकोप्याने व विश्वासाने काम केल्यामुळे बहुमत मिळणार हे निश्चितच होते. डॉ. संजय डी. पाटील यांनी सर्वांना एकत्र करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नेतृत्वगुण दर्शविताना तिन्ही जिल्ह्यांत जागा वाटप करताना न्याय दिला, त्याचा परिपाक म्हणून हे विकास आघाडीला बहुमत मिळाले आहे.

अध्यक्षीय भाषणात डॉ. डी. वाय. पाटील यांनी, विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर निवडणुकीत वर्चस्व मिळवताना डॉ. संजय डी. पाटील यांनी दाखविलेल्या ऐक्याच्या कौशल्याबाबत कौतुक केले.यावेळी आघाडीचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील यांचेही भाषण झाले. यावेळी प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राचार्य महादेव नरके यांनी केले. यावेळी महापौर हसिना फरास, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्रा. शंकरराव कुलकर्णी, अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, बाबा सावंत, प्रा. डी. यु. पवार, डॉ. डी. आर. मोरे, प्रताप ऊर्फ भैया माने, आदी उपस्थित होते.विद्यार्थी हाच केंद्रबिंदूआघाडीच्या माध्यमातून विविध अधिकार मंडळांवर सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तिन्हीही जिल्ह्याला जागा वाटप करताना न्याय दिल्यानेच हे यश मिळवता आले. मतदारांनी विश्वासाने दिलेली जबाबदारी आम्ही विद्यार्थी हाच विकासाचा केंद्रबिंदू मानून पार पाडू, अशी ग्वाही विद्यापीठ विकास आघाडीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी दिली.शिवाजी विद्यापीठातील विविध अधिकार मंडळांवर विजयी झालेल्या विकास आघाडीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात आघाडीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांचा सत्कार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. एल. जी. जाधव, प्रा. डी. यु. पवार, डॉ. डी. आर. मोरे, प्रा. क्रांतीकुमार पाटील, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, महापौर हसिना फरास, प्रा. अभयकुमार साळुंखे, डॉ. जे. एफ. पाटील, आदी उपस्थित होते.