शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Shahu Maharaj Jayanti संग्रहालयाची निविदा भरलेल्या ठेकेदाराला सदस्यांचाच विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 11:11 IST

राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी संग्रहालय उभारणीच्या कामाला पुन्हा विलंब लागण्याची चिन्हे आहेत. दोन निविदा अंतिम मंजुरीसाठी पाठविल्या असताना, या ठेकेदारांना खुद्द राजर्षी शाहू जन्मस्थळ (लक्ष्मी विलास) जतन, संवर्धन व विकास समितीच्या सदस्यांनीच विरोध केला आहे.

ठळक मुद्देसंग्रहालयाची निविदा भरलेल्या ठेकेदाराला सदस्यांचाच विरोधपुन्हा पेच निर्माण होण्याची शक्यता

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी संग्रहालय उभारणीच्या कामाला पुन्हा विलंब लागण्याची चिन्हे आहेत. एकीकडे १३ कोटी रुपयांच्या कामासाठी तीन वेळा निविदा काढूनही प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा नव्या मागविलेल्या निविदांमधून दोन निविदा अंतिम मंजुरीसाठी पाठविल्या असताना, या ठेकेदारांना खुद्द राजर्षी शाहू जन्मस्थळ (लक्ष्मी विलास) जतन, संवर्धन व विकास समितीच्या सदस्यांनीच विरोध केला आहे.शाहू महाराजांच्या स्मृतीस अभिवादन केल्यानंतर झालेल्या चर्चेवेळी समिती सदस्य डॉ. जयसिंगराव पवार आणि इंद्रजित सावंत यांनी ज्या ठेकेदारांनी निविदा भरली आहे, त्यांना आमचा विरोध असल्याचे सांगितले.

संग्रहालय उभारणीच्या कामाचा अनुभव आता निविदा भरलेल्या ठेकेदारांना नसल्याचा दावा करीत यावेळी सावंत यांनी याबाबत फेरविचार करण्याची मागणी केली. पालकमंत्र्यांनी मात्र ‘शासकीय निधीतून काम करताना जे नियम आहेत, त्यांनुसार त्यांनी निविदा भरली असेल आणि तुमचा विरोध असेल तर मग आता अवघड आहे,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.या कामासाठी तीन निविदा काढूनही प्रतिसाद न मिळाल्याने पॅनेलबाहेरील ठेकेदारांच्या निविदा मागविल्या होत्या. पाच निविदा आल्यानंतर त्यांतील तीन नाकारण्यात आल्या. दोन अंतिम मंजुरीसाठी पाठविल्या असून, त्या निविदा एकाच ठेकेदाराच्या असून, त्यांना डॉ. पवार आणि सावंत यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आता पुन्हा पेच निर्माण झाला आहे. याबाबत पालकमंत्र्यांनी जाताना आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर यांच्याशीही चर्चा केली.

.महाराष्ट्रामध्ये १७ संग्रहालये आहेत. या ठिकाणी पुरातत्त्व विभागाचे संचालनालय आहे. या ठिकाणी अनेक तज्ज्ञ मंडळी आहेत. मग ज्याला या कामाचा अनुभव नाही, अशा ठेकेदाराला काम कशासाठी द्यायचे, असा आमचा सवाल आहे. त्यामुळे या विभागानेच हे काम हाती घेऊन पूर्ण करावे, अशी आमची मागणी आहे. म्हणून या ठेकेदाराला आमचा विरोध आहे.- इंद्रजित सावंतसमिती सदस्य 

 

टॅग्स :Shahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंतीkolhapurकोल्हापूर