शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्य बाल हक्क आयोगावरील सदस्य बदलणार, शासनाने मागविली नामांकने

By विश्वास पाटील | Updated: January 3, 2025 12:14 IST

विश्वास पाटील कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची मुदत संपत आल्याने नव्याने अध्यक्ष, सदस्य नियुक्तीची प्रक्रिया शासनाने गुरुवारी ...

विश्वास पाटीलकोल्हापूर : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची मुदत संपत आल्याने नव्याने अध्यक्ष, सदस्य नियुक्तीची प्रक्रिया शासनाने गुरुवारी सुरू केली. राज्यात तीन पक्षांचे सरकार सत्तेत आल्याने सर्वच पक्षांकडून यातील सात पदांसाठी मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. अर्ज (नामांकन) सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत आहे.मावळत्या आयोगाची मुदत २९ एप्रिलपर्यंत संपते. यापूर्वीच्या सदस्यांची घोषणा करणारे राजपत्र २९ एप्रिल २०२२ ला प्रसिद्ध झाले होते. मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या ॲड. सुशीबेन शहा या सध्याच्या अध्यक्षा आहेत. त्यामध्ये ॲड. संजय सेंगर (अकोला), ॲड. जयश्री पालवे (पुणे), ॲड नीलिमा चव्हाण (मुंबई), ॲड. प्रज्ञा खोसरे (बीड), डॉ. सायली पालखेडकर (नाशिक) आणि चैतन्य पुरंदरे (पुणे) हे सहा सदस्य होते. आता त्यांची मुदत संपत असल्याने नव्याने अध्यक्ष व सदस्य निवडीसाठी शासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. महिला व बालकल्याण मंत्री निवड समितीच्या अध्यक्षा असतात. त्यामध्ये राज्यमंत्री आणि एक स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी सदस्य असतो.

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत येताना मंत्रिपदासाठीही तिन्ही पक्षात चांगलीच रस्सीखेच झाली..आता महामंडळे, विविध आयोग अशा महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळण्यासाठी तिन्ही पक्षांचे समर्थक फिल्डिंग लावू शकतात. त्यामुळेच अध्यक्ष, सदस्य पदासाठी जास्त संख्येने अर्ज येण्याची शक्यता आहे.

तीन वर्षे कालावधी..नियुक्त केलेल्या सदस्यांचा कालावधी तीन वर्षांचा असेल. अध्यक्षांचे वय ६५ पेक्षा कमी असेल. सदस्यांचे वय ६० पर्यंतच राहील. किमान पदवीधर ही शैक्षणिक अर्हता आहे. इच्छुकांनी महिला व बालविकास आयुक्त पुणे यांच्या कार्यालयाकडे अर्ज पाठवायचे आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर