रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे प्रेसिडेन्टपदी मेघराज चुघ यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:18 IST2021-06-25T04:18:20+5:302021-06-25T04:18:20+5:30

या पदग्रहण सोहळा कोरोनाचे सर्व नियम व खबरदारी घेऊन डिजिटली घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी इंटरनॅशनल ...

Meghraj Chugh elected President of Rotary Club of Kolhapur | रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे प्रेसिडेन्टपदी मेघराज चुघ यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे प्रेसिडेन्टपदी मेघराज चुघ यांची निवड

या पदग्रहण सोहळा कोरोनाचे सर्व नियम व खबरदारी घेऊन डिजिटली घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर वेंकटेश, डिस्ट्रीक्ट गव्हर्नर गिरीष धोंड, एजी रोटरियन करुणाकर नायक यांच्यासह क्लबचे सर्व पदाधिकारी व सभासद यांनी सहभागी झाले होते. हस्तांतर विधी पीडीजी प्रताप यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत झाला. वर्ष २०२०-२१ च्या सर्व कार्याची विस्तृत माहिती देत प्रेसिडेंट व सेक्रेटरी यांनी पदभार हस्तांतरण केले. नूतन प्रेसिडेंट चुघ व सेक्रेटरी राठोड यांनी पुढील वर्षाच्या कार्यक्रमाची रुपरेषा व राबविल्या जाणाऱ्या नवीन प्रकल्पांची माहिती दिली. यानिमित्त माजी गव्हर्नर वेेंकटेश, नवे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर गिरीष धोंड, माजी गव्हर्नर प्रताप पुराणिक, असिस्टंट गव्हर्नर करुणाकर नायक, असिटंट गव्हर्नर डाॅ. सुहास कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करून नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या डिजिटली कार्यक्रमाची प्रस्तुती व सादरीकरण अभिजीत हावळ, प्रथमेश इंगळे यांनी पाहिले, तर नीतेश पटेल यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो : २४०६२०२१-कोल- रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर

आेळी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरच्या पदग्रहण समारंभात डावीकडून नूतन ट्रेझरर आण्णासाहेब नाईक, नूतन सेक्रेटरी कुशल राठोड, नूतन प्रेसिडेंट मेघराज चुघ, असि.गव्हर्नर करुणाकर नायक, प्रताप पुराणिक, अरविंद कृष्णन, सिद्धार्थ पाटणकर, अभिजीत भोसले उपस्थित होते.

Web Title: Meghraj Chugh elected President of Rotary Club of Kolhapur