शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विमानतळाच्या नामकरणाबाबत महिन्याभरात बैठक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 10:59 IST

Airport Kolhapur- कोल्हापूर येथील कोल्हापूर विमानतळाचे छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत दिल्ली येथे महिन्याभरात बैठक होण्याची शक्यता आहे. नागरी उड्डयन खात्याने या विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला आहे. तत्कालीन केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी दोन वर्षांपूर्वी या विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याची घोषणा केली होती.

ठळक मुद्देकोल्हापूर विमानतळाच्या नामकरणाबाबत महिन्याभरात बैठक! पंतप्रधान कार्यालयाकडे प्रस्ताव : सुरेश प्रभू यांच्याकडून दोन वर्षांपूर्वी घोषणा

कोल्हापूर : येथील कोल्हापूरविमानतळाचे छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत दिल्ली येथे महिन्याभरात बैठक होण्याची शक्यता आहे. नागरी उड्डयन खात्याने या विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला आहे. तत्कालीन केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी दोन वर्षांपूर्वी या विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याची घोषणा केली होती.कोल्हापूर विमानतळ सुरू करण्यात छत्रपती राजाराम महाराज यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे या विमानतळास त्यांचे नाव देण्यासाठी राजारामपुरी व्यापारी असोसिएशन, राष्ट्रीय मोडी विकास प्रबोधिनी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजकडून गेल्या २२ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे.

या विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा ठराव दि. २७ मार्च २०१८ रोजी विधिमंडळात करण्यात आला. हा ठराव राज्य शासनाने नागरी विमान वाहतूक विभागाकडे पाठविला. त्यानंतर दि. २ फेब्रुवारी २०१९ रोजी विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाच्या भूमिपूजनावेळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनीही नामकरणाची घोषणा केली. त्यावर पुढे नागरी उड्डयन खात्याने नामकरणाचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला.

आता या प्रस्तावावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार आहे. औरंगाबाद येथील खासदार डॉ. भागवत कराड यांनी नागरी उड्डयनमंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेतली. त्यावर शिर्डी, कोल्हापूर, औरंगाबादसह अन्य १३ विमानतळांच्या नामकरणाचे प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती मंत्री पुरी यांनी दिली. मंत्रिमंडळाची बैठक महिन्याभरात होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्याबाबत महिन्याभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. या नामकरणासाठी गेल्या २२ वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करीत आहोत. नामकरणाची अंमलबजावणी सरकारकडून लवकर व्हावी.- ललित गांधी,अध्यक्ष, राजारामपुरी व्यापारी असोसिएशन

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर