शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

 सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीसोबत पुढील आठवड्यात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 16:54 IST

टोलविरोधी आंदोलनात कोणत्या पोलीस ठाण्यात कोणत्या कलमाखाली आंदोलकांवर गुन्हे दाखल आहेत, याची माहिती गोळा करून ती सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांना दिले. त्याचबरोबर ही माहिती मिळाल्यानंतर पुढील आठवड्यात पोलीस प्रशासनासोबत बैठक घेऊन याबाबत अहवाल तयार करून तो शासनाला पाठविला जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.

ठळक मुद्देपोेलीस ठाणेनिहाय गुन्ह्यांची माहिती घेऊन अहवाल पाठवू: जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही पुढील आठवड्यात पोलीस प्रशासनासोबत बैठक

कोल्हापूर : टोलविरोधी आंदोलनात कोणत्या पोलीस ठाण्यात कोणत्या कलमाखाली आंदोलकांवर गुन्हे दाखल आहेत, याची माहिती गोळा करून ती सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांना दिले. त्याचबरोबर ही माहिती मिळाल्यानंतर पुढील आठवड्यात पोलीस प्रशासनासोबत बैठक घेऊन याबाबत अहवाल तयार करून तो शासनाला पाठविला जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरचा टोल रद्द करून आंदोलकांवरील गुन्हे काढून टाकण्याचे निर्देश तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना दिले होते; परंतु अद्यापही अनेक गुन्हे न्यायालयात प्रलंबित असून त्यासाठी नेमलेल्या तारखांना आंदोलकांना फेºया माराव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी देसाई यांची भेट घेऊन निवेदन सादर करून चर्चा केली.टोल रद्द करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पाठपुरावा व पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळे कृती समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच पालकमंत्र्यांची भेट घेऊन आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत, याबाबत निवेदन दिले. त्यावर पालकमंत्र्यांनी सर्व गुन्हे काढून टाकण्याची जबाबदारी स्वत: घेतली आहे. तसेच त्यांनी केलेल्या सूचनेनुसार याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना द्यावे. तसेच गुन्ह्यांबाबतची संपूर्ण माहिती संकलित करून तिचा अहवाल पालकमंत्र्यांमार्फत शासनाला सुपूर्द करता येईल, अशी व्यवस्था करावी, असे पालकमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यानुसार कृती समितीतर्फे निवेदन देण्यात येत आहे.शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक काकडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून, कोणत्या पोलीस ठाण्यात कोणत्या कलमाखाली टोलविरोधी आंदोलकांवर गुन्हे दाखल आहेत, याची माहिती गोळा करावी असे सांगितले. तसेच पुढील आठवड्यात या संदर्भात पोलीस प्रशासनासोबत बैठक घेऊन अहवाल तयार करून तो पालकमंत्र्यांमार्फत शासनाला पाठविला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्याची प्रत कृती समितीलाही दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.यावेळी समितीचे निमंत्रक निवास साळोखे, बाबा पार्टे, अशोक पोवार, दिलीप देसाई, प्रसाद जाधव, किसन कल्याणकर, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, जयसिंग शिंदे, गौरव लांडगे, स्वप्निल पार्टे, दिलीप माने, महादेव पाटील, विवेक कोरडे, सुनील खिरूगडे, संदीप कांबळे, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :tollplazaटोलनाकाkolhapurकोल्हापूर