शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सर्किट बेंचबाबत सोमवारी बैठक, २६ फेब्रुवारीला मुख्य न्यायाधीशांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 17:11 IST

कोल्हापूर येथील सर्किट बेंचबाबत चर्चा करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी २६ फेब्रुवारीला खंडपीठ कृती समितीला निमंत्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाची सोमवार (दि. १८) न्यायसंकुलामध्ये बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती बारचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी शुक्रवारी दिली.

ठळक मुद्देसर्किट बेंचबाबत सोमवारी बैठक२६ फेब्रुवारीला मुख्य न्यायाधीशांशी चर्चा

कोल्हापूर : येथील सर्किट बेंचबाबत चर्चा करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी २६ फेब्रुवारीला खंडपीठ कृती समितीला निमंत्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाची सोमवार (दि. १८) न्यायसंकुलामध्ये बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती बारचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी शुक्रवारी दिली.कोल्हापूर सर्किट बेंचचा प्रश्न गेली काही वर्षे ऐरणीवर आला असून, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यांतील वकिलांनी या प्रश्नासंबंधी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी घ्यावयाचा असून, त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

खंडपीठ कृती समितीने मुख्य न्यायाधीशांची वेळ मागितली होती. त्यानुसार २६ फेब्रुवारीला बैठकीचे निमंत्रण कृती समितीला आले आहे. मुख्य न्यायाधीशांसमोर सर्किट बेंच संदर्भातील मंत्रिमंडळाचा ठराव सादर केला आहे. शासनाने जागेसह निधीची उपलब्धता करून देण्याचेही लेखी पत्र दिले आहे. आपण तत्काळ मंजुरी द्यावी, अशी विनंती शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.

गेल्या ३४ वर्षांच्या संघर्षाचा आढावा यावेळी सांगितला जाणार आहे. कोणी काय बोलायचे यासंबंधी जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाची बैठक सोमवारी घेण्यात आली आहे. त्यानंतर सहा जिल्ह्यांतील कृती समिती सदस्यांची बैठक घेऊन मुख्य न्यायाधीशांसोबत चर्चेला कोणी जायचे त्यांची नावे निश्चित केली जाणार आहेत, असे अ‍ॅड. चिटणीस यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर