शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Maharashtra Vidhan Sabha 2019 : सभा महायुतीची; परंतु त्यात शिवसेनाही बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 18:04 IST

कोल्हापूर येथे रविवारी झालेल्या महायुतीच्या प्रचारार्थ झालेल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेत भाजपचा आणि त्यातही कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांचाच जास्त प्रभाव राहिल्याचे दिसून आले. सभास्थळी शिवसेनेचा एकही झेंडा नव्हता आणि सभेकडे शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या दोन आमदारांसह दोन्ही खासदारांनीही पाठ फिरविली.

ठळक मुद्देसभा महायुतीची; परंतु त्यात शिवसेनाही बेदखलमहाडिक यांचा प्रभाव : दोन्ही खासदारांची सभेला दांडी

कोल्हापूर : येथे रविवारी झालेल्या महायुतीच्या प्रचारार्थ झालेल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेत भाजपचा आणि त्यातही कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांचाच जास्त प्रभाव राहिल्याचे दिसून आले. सभास्थळी शिवसेनेचा एकही झेंडा नव्हता आणि सभेकडे शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या दोन आमदारांसह दोन्ही खासदारांनीही पाठ फिरविली.

सभेला कर्नाटक व सोलापूरकडूनही आलेल्या वाहनांची संख्या लक्षणीय होती.ही सभा भाजप-शिवसेनेसह महायुतीची सभा असल्याचे अगोदरही जाहीर करण्यात आले होते. सभेतही प्रत्येक नेत्यांनी भाजप-शिवसेना, रासप, रिपाइं, शिवसंग्राम आणि रयत क्रांती या पक्षांची दखल भाषणात घेतली; परंतु सभास्थळी अन्य पक्षांचा झेंडा सोडाच; त्यांचा कोणताही नेता या सभेकडे फिरकला नाही.

व्यासपीठासमोरील बाजूसही महाडिक समर्थक कार्यकर्त्यांची संख्या जास्त होती. त्यामुळेच महाडिक हे नुसते नाव जरी घेतले तरी त्याला जल्लोषी प्रतिसाद मिळत होता. महायुतीच्या उमेदवारांची गृहमंत्री शहा यांनी ओळख करून देतानाही अमल महाडिक यांच्यावेळी जल्लोष झाला व इतर उमेदवारांची नावे वाचून दाखविल्यावर फारशा कुणी टाळ्याही वाजविल्या नाहीत. सभास्थळी सुरुवातीपासूनच सभा संपेपर्यंत ‘दक्षिणेत अमल... पुन्हा कमळ’ हेच गाणे वाजत होते.व्यासपीठाच्या मागील बाजूस लावलेल्या फलकावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता; परंतु पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो मात्र वापरला नसल्याने त्याचीही चर्चा झाली. आमदारांच्या फोटोमध्येही आमदार सुरेश हाळवणकर भाजपचे ज्येष्ठ आमदार असूनही त्यांचा फोटो सहाव्या क्रमांकावर लावण्यात आला होता.

कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने हे जरी शिवसेनेचे असले तरी ते महायुतीचे म्हणून निवडून आले आहेत; परंतु त्यांना कोणतेच निरोप नसल्याने ते सभेला उपस्थित नव्हते. आमदार चंद्रदीप नरके व आमदार सत्यजित पाटील यांनीही सभेपेक्षा रविवारी मतदारसंघात प्रचारदौरे करण्यास प्राधान्य दिले.

शिवसेनेचे जे उमेदवार सभेला आले, त्यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना या सभेला आणले नव्हते. ते व्यक्तिगत आपापल्या गाडीतूनच सभेसाठी आले. व्यासपीठावर दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची ओळख करून दिली असली तरी फलकावर मात्र फक्त भाजपचेच कमळ चिन्ह झळकत होते. तिथेही शिवसेनेचा धनुष्यबाण गायब केला होता.

महायुतीची सभा म्हणून या प्रमुख दोन्ही पक्षांकडून जे एकत्रित शक्तिप्रदर्शन या सभेच्या निमित्ताने व्हायला हवे होते, तसे झाल्याचे दिसले नाही. ‘कोल्हापूर दक्षिण’चे आमदार अमल महाडिक यांच्यासाठीच ही सभा घेतल्याचे चित्र दिसत होते.बंडखोरांना दमप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सभेतही दोन्ही पक्षांच्या बंडखोरांना जाता-जाता दम दिला. ते म्हणाले, ‘बंडखोरांना मी सांगू इच्छितो की, महायुतीशी द्रोह आम्ही सहन करणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही.’ 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाkolhapurकोल्हापूर