शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट महामंडळाची १५ तारखेला सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 11:27 IST

मराठी चित्रपट व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची वार्षिक सभा १५ तारखेला होत आहे. या सभेत मिलिंद अष्टेकर यांची विनयभंग प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर घडलेले नाट्य, महामंडळाने पाठवलेली नोटीस व सभासदत्व रद्दच्या मागणीचा मुद्दा कळीचा बनणार आहे.

ठळक मुद्देचित्रपट महामंडळाची १५ तारखेला सभानिषेध...नोटीस आणि वादाचे उमटणार पडसाद

कोल्हापूर : मराठी चित्रपट व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची वार्षिक सभा १५ तारखेला होत आहे. या सभेत मिलिंद अष्टेकर यांची विनयभंग प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर घडलेले नाट्य, महामंडळाने पाठवलेली नोटीस व सभासदत्व रद्दच्या मागणीचा मुद्दा कळीचा बनणार आहे.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची सभा म्हणजे वाद हे समीकरणच झाले आहे. यंदा ही सभा शाहू सांस्कृतिक भवन येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. २०१४ साली तत्कालीन उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्याविरोधात अभिनेत्री छाया सांगावकर यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. मागील महिन्यात या आरोपातून अष्टेकर यांची निर्दोष मुक्तता झाली, यानंतर महामंडळाच्या दारातच छाया सांगावकर, अर्जुन नलवडे व सुरेंद्र पन्हाळकर यांच्या निषेधाचा फलक लावून त्यांचे सभासदत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.

या घटनेनंतर महामंडळाने अष्टेकर यांना तुमचे सभासदत्व रद्द का करण्यात येऊ नये, अशी नोटीस काढली आहे, तर अष्टेकर हे महामंडळाच्या सभेत वरील तिघांचे सभासदत्व रद्दची मागणी करणार आहेत. या सगळ्या वादाचे पडसाद यंदाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवर पडणार आहेत.जुन्या जागेच्या विक्रीला विरोधचित्रपट महामंडळाने कार्यालयासाठी रेल्वे स्टेशनसमोरील वास्तूची खरेदी केली आहे. सभेत महामंडळाचे जुने कार्यालय विक्रीवर चर्चा करण्यात येणार आहे; मात्र कोल्हापुरातील चित्रपट व्यावसायिकांचा जुन्या कार्यालयाच्या विक्रीला विरोध आहे. हे कार्यालय खासबाग या शहराच्या मध्यवर्ती परिसरात आहे. वास्तू विकण्याऐवजी तेथे कॉन्फरन्स हॉल, नव्या कलाकारांना तालमींसाठी भाडेतत्वावर देणे, असा उत्पन्नवाढीसाठी उपयोग करून घेता येईल, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर