शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मिरजेत पंजांची भेट, सरबत गाड्यांच्या मिरवणुकीने मोहरमची सांगता

By admin | Updated: November 5, 2014 00:07 IST

पहाटे बाराईमाम दर्गा परिसरात पंजांच्या भेटीनंतर दुपारी मिरवणुकीने सरबत वाटप करण्यात

मिरज : मिरजेतील पंजांच्या चौथ्या भेटीने व सरबत गाड्यांच्या मिरवणुकीने मोहरमचा समारोप झाला. पहाटे बाराईमाम दर्गा परिसरात पंजांच्या भेटीनंतर दुपारी मिरवणुकीने सरबत वाटप करण्यात आले. मिरवणूक मार्गावर महापालिकेसह विविध सामाजिक संस्था, संघटनांतर्फे सरबत गाड्यांचे स्वागत करण्यात आले. बाराईमाम दर्गा येथे आज पहाटे मीरासाहेब दर्गा येथून आलेल्या पंजांची चौथी भेट पार पडली. पंजांच्या भेटीसाठी भाविकांची मोठी गर्दी होती. भेटीनंतर सायंकाळी पंजांचे विसर्जन झाले. मानाच्या बैलगाड्यांतून नगाऱ्यासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत कमानवेस मित्र मंडळ, बोलवाड येथील बारगीर यांचा मानाचा ताबूत सहभागी होता. गोल्डन ग्रुपने मक्केची सुंदर प्रतिकृती साकारून मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधले. मिरवणूक मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. शहरातील मार्केट ते मीरासाहेब दर्गा चौकदरम्यान मिरवणुकीद्वारे सजविलेले ट्रक, ट्रॅॅक्टर, टेम्पोतून सरबताचे वाटप करण्यात आले. यावेळी भाविकांनी मिरवणूक मार्गावर मोठी गर्दी केली होती होती. मिरवणूक मार्गावर खादीम ग्रुप सर्कल, सांगली, मिरज, कुपवाड महापालिका यांच्यातर्फे स्वागत क क्ष उभारण्यात आले होते. सुमारे २०० वाहने आणि हजारो भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते. स्वागत कक्षातून महापालिका आयुक्त अजिज कारचे, नगरसेवक बसवेश्वर सातपुते, समीर मालगावे, संजय मेंढे, अतहर नायकवडी, विठ्ठल खोत, साजिद पठाण, अल्लाबक्ष नदाफ, सहाय्यक आयुक्त टीना गवळी यांच्यासह मान्यवरांनी सरबत गाड्यांचे स्वागत केले. सायंकाळी दर्गा चौकात मिरवणुकीचा समारोप झाला. (वार्ताहर)सांगली शहरात खोजा समाजातर्फे मोहरमनिमित्त शोक मिरवणूकसांगली : मोहरमनिमित्त खोजा समाजातर्फे आज, मंगळवार दुपारी शहरातून शोक मिरवणूक (मातम) काढण्यात आली. मोहरमनिमित्त ३९ मंडळांकडून ८५ पंजे व एका ताबुताची स्थापना करण्यात आली होती. या सर्व मंडळांची रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूक सुरु होती. खोजा समाजातर्फे खोजा कॉलनीतून शोक मिरवणुकीस प्रारंभ झाला. हळद भवनमार्गे काँग्रेस भवनजवळ ही मिरवणूक आली. करबलाच्या हुतात्म्याच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करुन गेल्या अनेक वर्षांपासून ही शोक मिरवणूक काढली जात आहे. काँग्रेस भवनपासून राजवाडा चौक, कापड पेठ, बालाजी चौक, टिळक चौक या मार्गावरुन कृष्णा नदीवर मिरवणुकीची सांगता झाली. ठिकठिकाणी सरबत वाटप झाले. मिरवणुकीत महम्मदभाई खोजानी, अकबरभाई खोजानी, सादीक रेजानी, शाफीन रुपानी आदी सहभागी झाले होते. शहरात स्थापन करण्यात आलेल्या ३९ मंडळांच्या पंजांची सायंकाळी विसर्जन मिरवणूक निघाली. डॉल्बी, ताशांच्या निनादात या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरु होत्या.