शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

रेडिरेकनर दराबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक राजीव परीख : अधिवेशनानंतर भेटणार; ‘लोकमत’ला सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 01:05 IST

बांधकाम क्षेत्रातील उलाढाल अपेक्षेप्रमाणे अजून वाढलेली नाही; त्यामुळे यावर्षी राज्य शासनाने रेडिरेकनरचे दर कमी करावेत, या मागणीसाठी ‘क्रिडाई महाराष्ट्र’कडून पाठपुरावा सुरू आहे.

कोल्हापूर : बांधकाम क्षेत्रातील उलाढाल अपेक्षेप्रमाणे अजून वाढलेली नाही; त्यामुळे यावर्षी राज्य शासनाने रेडिरेकनरचे दर कमी करावेत, या मागणीसाठी ‘क्रिडाई महाराष्ट्र’कडून पाठपुरावा सुरू आहे. याबाबत अधिवेशनानंतर मुख्यमंत्र्यांसमवेत संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक होईल, असे ‘क्रिडाई महाराष्ट्र’चे नूतन अध्यक्ष राजीव परीख यांनी मंगळवारी येथे सांगितले.

अध्यक्ष परीख यांनी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष परीख यांचे स्वागत केले. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, जाहिरात व्यवस्थापक विवेक चौगुले, साहाय्यक जाहिरात व्यवस्थापक उदय चौगले, ‘क्रिडाई कोल्हापूर’चे माजी अध्यक्ष गिरीष रायबागे, विद्यमान उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सदस्य अभिजित मगदूम, उत्तम फराकटे, सुजय होसमणी, संजय डोईजड, श्रेयांश मगदूम, गौतम परमार उपस्थित होते. अध्यक्ष परीख म्हणाले, गेले वर्ष वगळता त्यामागील चार वर्षे राज्य शासनाने रेडिरेकनरचे दर वाढविले आहेत. इतके दर वाढविण्याची गरज नव्हती. मागील तीन वर्षांपासून बांधकाम क्षेत्रातील उलाढाल संथपणे होत आहे. त्यात अजूनही अपेक्षेप्रमाणे वाढ झालेली नाही; त्यामुळे यावर्षी रेडिरेकनरचे दर वाढविण्यात येऊ नयेत.व्यावसायिकांच्या अडचणी सोडविण्यावर भरया ठिकाणी वास्तविकतेपेक्षा अधिक दरवाढ झाली आहे. ती कमी करावी, अशी मागणी ‘क्रिडाई महाराष्ट्र’ने राज्यातील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे.रेडिरेकनरचे दर वाढू नयेत, ते कमी व्हावेत यासाठी संघटनेचा नेटाने पाठपुरावा सुरू आहे.बांधकाम व्यावसायिकांसमोरील अडचणी शासन दरबारी मांडून त्या जलदगतीने सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.कोल्हापुरात मंगळवारी ‘क्रिडाई महाराष्ट्र’चे नूतन अध्यक्ष राजीव परीख यांनी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. त्यांचे स्वागत ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी केले. यावेळी डावीकडून विवेक चौगुले, गिरीष रायबागे, उत्तम फराकटे, अभिजित मगदूम, विद्यानंद बेडेकर, मकरंद देशमुख, सुजय होसमणी, गौतम परमार, श्रेयांश मगदूम, संजय डोईजड उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर