शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

गरजू सहाध्यायींना विद्यार्थ्यांची दिवाळी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 17:11 IST

कोल्हापूर येथील शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांनी गुरुवारी सहा वर्षांची परंपरा जपत आपल्याच शाळेतील दोन गरजू सहाध्यायींना दिवाळीची अनोखी भेट दिली.

ठळक मुद्दे फटाक्यांचे पैसे वाचवून केली मदत शिवाजी मराठा हायस्कूलची सहा वर्षांची परंपराजमा केलेल्या रक्कमेतून कपडे खरेदी निवृत्त सहायक शिक्षण उपसंचालक संपतराव गायकवाड, रमेश राणे यांचा हातभार

कोल्हापूर : येथील शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांनी गुरुवारी सहा वर्षांची परंपरा जपत आपल्याच शाळेतील दोन गरजू सहाध्यायींना दिवाळीची अनोखी भेट दिली. फटाक्याचे पैसे वाचवून जमा केलेल्या पैशातून त्यांनी या चिमुकल्यांना कपडे भेट दिले. त्यांच्या चेहºयावरील अवर्णनीय आनंद शाळेतील साºयांनाच वेगळे काही केल्याचे समाधान मिळाले.दिवाळी तोंडावर आली असताना बच्चेकंपनीला नवीन ड्रेस, फटाके आणि फराळाचे वेध लागतात. परंतु, शिवाजी मराठा हायस्कूलमधील हे विद्यार्थी फटाके न उडविता शाळेतील गरीब आणि गरजू सहाध्यायी विद्यार्थ्यांंचा शोध घेत त्यांनी जमा केलेल्या रक्कमेतून कपडे खरेदी करुन दिवाळीची भेट देत असतात.कलाशिक्षक मिलिंद यादव यांनी हा पायंडा पाडला आहे. यामुळे गेली सहा वर्षे या शाळेत हा उपक्रम सुरु आहे. गरीब विद्यार्थ्यांना फटाक्याचे पैसे वाचवून अशाप्रकारे मदत करण्याची शिवाजी मराठा हायस्कूलची परंपरा याही वर्षी विद्यार्थ्यांनी कायम राखली. त्यांनी पैसे जमा करुन आपल्याच गरजू सहाध्यायी विद्यार्थ्यांचा शोध घेत त्यांच्या दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करुन एक आदर्श निर्माण केला आहे.कलाशिक्षक मिलिंद यादव यांच्या या उपक्रमाला मुख्याध्यापक प्रवीण काटकर, शिक्षक सविता प्रभावळे, आरती सुतार, अमर जगताप, आणासो माळी, प्रशांत पवार यांनी साथ दिली.गायकवाड, राणे यांचाही हातभारनिवृत्त सहायक शिक्षण उपसंचालक संपतराव गायकवाड आणि रमेश राणे या ८२ वर्षाच्या निवृत्त तहसीलदारांनीही आपल्याकडील रक्कम या विद्यार्थ्यांच्या जमापूंजीत जमा करुन गरजू विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी कपडे घेण्यासाठी हातभार लावला.औषधोपचारासाठी मदतविपन्नावस्थेतील रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक हे गोव्यातील रुग्णालयात उपचार घेत आहेत हे समजल्यानंतर त्यांच्या औषधांसाठी या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या खात्यावर पाच हजार रुपयांची रक्कम जमा केली.फोटो ओळ : कोल्हापूरातील शिवाजी मराठा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी रक्कम जमा करुन शाळेतील दोन गरजू सहकाºयांना गुरुवारी कपडे देउन दिवाळीची भेट दिली.

टॅग्स :Crackers Banफटाके बंदीdiwaliदिवाळी