शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

Meet

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:24 IST

Join a meeting Hangouts 4 of 65 'वनीकरण तुमचं आणि मरण आमचं' शित्तूर-वारुणपैकी ढवळेवाडी, विठ्ठलाई वाडा व तळीचा वाडा ...

Join a meeting

Hangouts

4 of 65

'वनीकरण तुमचं आणि मरण आमचं'

शित्तूर-वारुणपैकी ढवळेवाडी, विठ्ठलाई वाडा व तळीचा वाडा ग्रामस्थांची व्यथा;

सतीश नांगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

शित्तूर-वारुण : वाडवडिलांपासून कसत असलेल्या व प्रामुख्याने वहिवाट असणाऱ्या डोंगररानात वन विभागाने प्रादेशिक वनीकरणाचे काम सुरू केले असल्याने शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) पैकी ढवळेवाडी, विठ्ठलाई वाडा व तळीचा वाडा येथील ग्रामस्थांनी या कामास तीव्र विरोध केला असून, 'आधी आम्हाला खड्डयात गाढा व मगच सुरू असलेले हे बेकायदेशीर वनीकरण करा' अशी भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे.

वाडवडिलांपासून चालत आलेली व कूळ म्हणून कसत असलेली जमीन ही मूळ मालकाच्याच नावे राहिल्याने व मूळ मालक मृत्यू पावल्याने संबंधीत शेतकऱ्यांच्या हाती कागदोपत्री कोणताच पुरावा नाही. जिवंत असलेली हाडामांसाची माणसं, एवढाच काय तो पुरावा आणि याच जिवंत असलेल्या माणूसपणाचं अस्तित्वच नाकारण्याचा काहीसा प्रकार हा शित्तूर-वारुण या ठिकाणी घडतो आहे.

प्रल्हाद राघवेंद्र देसाई या मूळ मालकाची या परिसरात जवळजवळ २२०० हेक्टर जमीन आहे. त्या जमिनीत या वाड्या-वस्त्यांवरील १२५ कुळं आहेत. २२०० हेक्टरपैकी १९७५ च्या नोटिफिकेशननुसार ६०० हेक्टर जमीन ही वन विभागाला प्राप्त झाली असून सध्या त्याच जमिनीत वनीकरणाचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून या जमिनीत लागवडीचे काम सुरू असून आतापर्यंत ४५ हजार रोपांचे वनीकरण या ठिकाणी केले आहे. यावर्षी सुमारे ३२ हजार ५०० रोपांचे वनीकरण करण्याच्या तयारीत सध्या वन विभाग आहे. मूळ मालकाच्या जमिनीसाठी वन विभाग, स्वतःला वारस म्हणवून घेणारे आणि या जमिनीचा खरेदी व्यवहार करणाऱ्यांमध्ये कोर्टात दावे-प्रतिदावे सुरू आहेत. दीडशे-दोनशे वर्षांपासून जमीन कसत असलेल्या शेतकऱ्यांचे यांच्यापैकी कोणालाही कसल्याही प्रकारचे सोयरसुतक नाही. डोंगर-दऱ्यात राहणाऱ्या या अज्ञानी शेतकरी वर्गाचा केवळ फायद्यासाठीच वापर केला जात आहे.

आतापर्यंत लोकसभा-विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक निवडणुकांमध्ये हा विषय केवळ चर्चेपुरताच मर्यादित राहिला आहे. कित्येकदा या जमिनीसाठी आंदोलनेही झाली आहेत. प्रत्यक्षात मात्र या शेतकऱ्यांना खऱ्याअर्थानं न्याय मिळण्याच्यादृष्टीने योग्य ते मार्गदर्शन किंवा त्यासाठी खरेखुरे प्रयत्न कधीच केलेले नाहीत आणि तशी तसदी घेण्याचे धाडस आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी याआधी कधीच दाखविलेले नाही. हा पेच सोडविण्यासाठी आता तरी लोकप्रतिनिधी प्रयत्न करतील का? आणि न्यायाच्या अपेक्षेत असलेल्या या शेतकऱ्यांना न्याय मिळेल का? हा खरा प्रश्न आहे.

प्रतिक्रिया -

या २२०० हेक्टर जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात केवळ बॉक्साईट मिळणार असल्यामुळे व यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार असल्यामुळे या जमिनीसाठी प्रचंड मोठ्या चढाओढी सुरू आहेत. आमच्या जमिनी या आमच्या नावावर होईपर्यंत आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. यापुढे आम्ही लोकशाहीच्या मार्गाने कायदेशीर पद्धतीने हा लढा अधिक व्यापक करणार आहे.

- नामदेव ढवळ ( ग्रामस्थ, ढवळेवाडी)

संबंधीत शेतकऱ्यांच्या नावावर ती जमीन नाही किंवा तशा स्वरूपाची कोणतीच कागदपत्रे त्यांच्याजवळ नाहीत. ती जमीन १९५३ पासून वन विभागाच्या नावावर असल्याने कायदेशीर मार्गाने त्या जमिनीवर सध्या प्रादेशिक वनीकरण्याचे काम सुरू आहे. शासकीय मोजणीनुसार ती जमीन जर खरोखरच शेतकऱ्यांची असेल, तर वनीकरणातील झाडांसहित ती शेतकऱ्यांना परत देण्यात येईल.

- नंदकुमार नलवडे (आरएफओ- शाहूवाडी)