शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ध्यान हा मानवी जीवनाचा वारसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 12:49 IST

प्रधान म्हणाले, प्रत्येकजण डोळे झाकून ध्यान करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्यांच्या मनात अनेक विचार येतात. प्रत्येकजण विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. प्रत्येकाला ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत ध्यानधारणाच त्या व्यक्तीला तारू शकते. यासाठी मन स्थिर कसे करता येईल, यावर अधिक भर दिला पाहिजे.

ठळक मुद्देतुषार प्रधान; ध्यानोत्सव; ‘हार्टफुलनेस’तर्फे आयोजन

कोल्हापूर : ध्यानधारणा हा मानवी जीवनाचा वारसा आहे. वैयक्तिक आयुष्यात त्याचा प्रत्येकाला फायदा होतो. काम कोणतेही असो; त्यात मन स्थिर करण्याचे काम केवळ ध्यानामुळे शक्य आहे, असे मत हार्टफुलनेस संस्थेचे प्रादेशिक समन्वयक तुषार प्रधान यांनी केले. कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये रविवारी सायंकाळी आयोजित केलेल्या ‘ध्यानोत्सव’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रधान म्हणाले, प्रत्येकजण डोळे झाकून ध्यान करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्यांच्या मनात अनेक विचार येतात. प्रत्येकजण विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. प्रत्येकाला ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत ध्यानधारणाच त्या व्यक्तीला तारू शकते. यासाठी मन स्थिर कसे करता येईल, यावर अधिक भर दिला पाहिजे. त्याकरिता ध्यान ही सुरुवात आहे. रोज सकाळी ध्यानसाधनेचा सराव केला तर अंतर्मनात एकमत होऊ शकते. प्रत्येक कामात रोज काही मिनिटे जरी ध्यान केले तरी त्याचा फायदा त्या व्यक्तीला वैयक्तिक आयुष्यात मोठ्या प्रमाणात होतो. प्राणाहुती (योगिक शक्तीचे संप्रेषण) व आंतरिक शुद्धिकरण हे ध्यानाचा सखोल अनुभव घेण्यास प्रभावीपणे सहायक ठरतात. ज्यामुळे एक संतुलित जीवन, निरोगी स्वास्थ्य, मन:शांती आणि शीघ्र व्यक्तिगत रूपांतरण शक्य होते. नियमित जीवनातही भांडणे करणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये शांत राहणारा जिंकतो. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ध्यान महत्त्वाचे आहे. त्याकरिता सराव आवश्यक आहे. शास्त्रोक्त पद्धतीने ध्यान कसे करायचे याबद्दल त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. के. ए. कुलकर्णी यांनी ध्यानावरील पुस्तकाचे विश्लेषण केले. प्रेरणा पाटील व नितीन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यानिमित्त ब्राईटर माइंडच्या वतीने डोळे झाकलेल्या मुलांनी अंतर्मनाने कागदावर लिहिलेले शब्द ओळखून दाखविले.तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, डॉ. सचिन पाटील, डॉ. सरोज नेजदार, डॉ. नितीन भोसले, आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.-------------फोटो स्वतंत्र ध्यानोत्सव या नावाने ओळींसह सेव्ह केले आहेत.----------- सचिन भोसले------------

 

टॅग्स :Meditationसाधनाkolhapurकोल्हापूर