शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात आढळला औषधी ‘काळा कुडा’ वृक्ष, वारसा वृक्ष म्हणून जपण्याची मागणी

By संदीप आडनाईक | Updated: April 13, 2023 19:11 IST

औषधी गुणांनी युक्त वृक्षाची वारसा वृक्ष म्हणून जतन करण्याची मागणी

कोल्हापूर : शहर आणि परिसरातील वृक्षांचे सर्वेक्षण करताना वनस्पती अभ्यासक डॉ. मकरंद ऐतवडे आणि वृक्षमित्र पारितोष उरकुडे यांना राजारामपुरी येथे नक्षत्र उद्यानामध्ये ‘काळा कुड्याचे’ दोन वृक्ष आढळले. या औषधी गुणांनी युक्त वृक्षाची वारसा वृक्ष म्हणून जतन करण्याची मागणी त्यांनी केली आहे.सन्मित्र हौसिंग सोसायटी आणि कोरगावकर हौसिंग सोसायटी यांच्या सदस्यांनी तयार केलेल्या या नक्षत्र उद्यानात इतर महत्त्वाच्या वनस्पतींसोबत काळ्या कुड्याचे वृक्ष आढळले. हे वृक्ष देशात नैसर्गिकरीत्या राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशातील आणि दक्षिण भारतात आढळून येतात. महाराष्ट्र तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या वनस्पती कोशामध्ये याची नोंद आढळते.रुई (ॲपोसायनेसी) कुळातील या वृक्षाला मराठीत कृष्णकुटज, काळी कुडई, गोड इंद्रजव अशीही नावे आहेत. शास्त्रीय नाव राइटिया टिंक्टोरिया असे आहे. विल्यम राईट या स्कॉटिश वनस्पतीतज्ज्ञाच्या स्मरणार्थ त्याला नाव दिले आहे. हा पानझडी वृक्ष ३-७ मीटर उंच वाढतो. याची साल गुळगुळीत आणि करड्या रंगाची असून सर्वांगामध्ये पांढरा चीक असतो. पाने साधी, गुळगुळीत आणि हिरवीगार असतात. याला एप्रिल-मे महिन्यात फुले येतात. फांद्यांच्या टोकाला चांदणीसारखी पांढरी, सुवासिक फुले येतात.याच्या लाकडाचा उपयोग शेतीची अवजारे बनविण्यासाठी तसेच कंगवे, मूर्ती, खेळणी बनविण्यासाठी होतो. पानांपासून निळा रंग तयार करतात. बियांना इंद्रजव म्हणतात. याची साल शक्तिवर्धक असून बी कामोत्तेजक आहे. या झाडाचा उपयोग कावीळ, सर्पदंश, दातदुखी, रक्तदोष, यकृताचे व पित्ताशयाचे रोग, मूळव्याध इत्यादींवर होतो.

कोल्हापुरातील औषधी गुणांनीयुक्त एकमेव अशा या ‘काळा कुडा’ वृक्षाला ‘हेरिटेज ट्री अर्थात वारसा वृक्षाचा’ दर्जा देणे आवश्यक आहे. - डॉ. मकरंद मोहनराव ऐतवडे, वनस्पती अभ्यासक

टॅग्स :kolhapurकोल्हापूर