शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

गणेश विसर्जनासाठी अशोक रोकडे यांची व्हाईट आर्मी सज्ज यांत्रिक बोट व वॉटर रेस्क्यु टीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 16:42 IST

आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी जीवनमुक्ती सेवा संस्थेच्यावतीने सुसज्ज यांत्रिक दोन बोट, वॉटर रेस्क्यु टीम तैनात ठेवण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय सोयीसुविधा देण्यात येत आहेत. अशी माहिती प्रमुख अशोक रोकडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देगणेश विसर्जनासाठी अशोक रोकडे यांची व्हाईट आर्मी सज्ज वैद्यकिय पथकासह यांत्रिक बोट व वॉटर रेस्क्यु टीम तयार

कोल्हापूर : आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी जीवनमुक्ती सेवा संस्थेच्यावतीने सुसज्ज यांत्रिक दोन बोट, वॉटर रेस्क्यु टीम तैनात ठेवण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय सोयीसुविधा देण्यात येत आहेत. अशी माहिती प्रमुख अशोक रोकडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले, विसर्जन मिरवणुकीत मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, अंबाबाई मंदिर, पापाची तिकटी या ठिकाणी वैद्यकिय पथकासह रेस्क्यु टीम तयार आहेत. यात एका टीमकडे अ‍ॅम्ब्युलन्ससह दोरखंड, फायर इक्स्टींग्युशर, स्ट्रेचर व्हाईट आर्मी जवान पॉकेट लाईनच्या आधारे गर्दीवर नियंत्रण करणे व जाणे-येणे, मार्गामध्ये व्यवस्था लावणे अशी कामे देण्यात आली आहेत.

ही टीम आपत्तीवेळी नियोजनबद्ध आणि प्रथमोपचार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने सीपीआरमध्ये पुढील उपचारासाठी हलवण्याची जबाबदारी घेईल. या ठिकाणी व्हाईट आर्मीच्या वैद्यकिय पथकात जनरल प्रॅक्टीसनर्स असो, डॉक्टरांची निहा, निमा संघटना, जिल्हा मुस्लिम मेडिको व पॅरामेडिको असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा जनरल प्रॅक्टीसनर्स असोसिएशन या संघटनाचे डॉक्टर्स मदत कार्यात सामील होत आहेत.आपत्कालीन वैद्यकिय पथकाजवळ सावली केअर सेंटर, अ‍ॅस्टर आधार हॉस्पीटल, श्री करवीर निवासीनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळ व व्हाईट आर्मी यांची मदत घेवून अ‍ॅम्ब्युलन्स सुविधा ठेवण्यात आली आहे. हे मदत कार्य सकाळी आठ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत असणार आहे. परिषदेस हेमंत कुलकर्णी, प्रशांत शेंडे, आदम मुल्लाणी, प्रेम सातपुते, आदेश कांबळे, अविनाश भांडवले आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर