शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांचा राजीनामा लांबणीवर, आता १0 ऑक्टोबरनंतर निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 14:57 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन महिन्यांत महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक घेऊ नये, असे स्पष्ट आदेश राज्य सरकारने दिल्यामुळे माधवी गवंडी यांनी राजीनामा देउ नये, अशी भूमिका महानगरपालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आल्यामुळे महापौरांचा राजीनामा लांबणीवर पडला आहे. अर्थात गणपूर्तीअभावीही सभा तहकूब झाल्याने येत्या १0 ऑक्टोबरपर्यंत माधवी गवंडी याच महापौरपदी राहतील, हे निश्चित.

ठळक मुद्देमहापौरांचा राजीनामा लांबणीवरआता १0 ऑक्टोबरनंतर निर्णय

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन महिन्यांत महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक घेऊ नये, असे स्पष्ट आदेश राज्य सरकारने दिल्यामुळे माधवी गवंडी यांनी राजीनामा देउ नये, अशी भूमिका आघाडीच्या नेत्यांनी आज घेतल्यामुळे महापौरांचा राजीनामा लांबणीवर पडला आहे. अर्थात गणपूर्तीअभावी सर्वसाधारण सभा तहकूब झाल्याने येत्या १0 ऑक्टोबरपर्यंत माधवी गवंडी याच महापौरपदी राहतील, हे निश्चित.कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांची सत्ता आहे. तिन्ही पक्षांनी सत्तेच्या राजकारणात पदांची वाटणी करून घेतली आहे. शिवसेनेच्या चार सदस्यांपैकी प्रतिज्ञा निल्ले यांना सलग पाच वर्षे स्थायी समितीवर सदस्य म्हणून तर नियाज खान, राहुल चव्हाण व अभिजित चव्हाण यांना प्रत्येकी एक वर्ष परिवहन सभापतिपद देण्यात आले. शिवसेनेला दिलेला ‘शब्द’ पाळला गेला.महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती अशा महत्त्वाच्या पदांकरीता काँग्रेस-राष्ट्रवादीत इच्छुकांची संख्या जास्त असल्याने आणि त्यातून आघाडीत धुसफूस होऊ नये म्हणून प्रत्येक सदस्याला काही ना काही देण्याचा प्रयत्न नेत्यांकडून सुरू आहे. सध्या एक वर्षाकरीता महापौरपद राष्ट्रवादीकडे आहे. इच्छुकांची संख्या तीन होती. सरिता मोरे यांना सहा महिने, माधवी गवंडी यांना दोन महिने संधी देऊन त्यांची महापौर होण्याची हौस भागविली.

आता अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांना उर्वरित चार महिन्यांकरीता महापौर करून त्यांनाही संधी दिली जाणार आहे. गवंडी यांची मुदत सोमवारी संपली. त्यामुळे त्या आज, मंगळवारी राजीनामा देणार होत्या, तशी घोषणाही केली आहे. परंतु पक्षांतर्गत गटबाजीच्या माध्यमातून गवंडी यांनी आणखी तीन महिने राहता यावे याकरीता प्रयत्न केले जात आहेत.दरम्यान, राज्य सरकारच्या नगर विभागातील प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्यामार्फत बजावलेल्या अध्यादेशाचा आधार घेत गवंडी यांनी राजीनामा देउ नये, अशी भूमिका मंगळवारी आघाडीच्या नेत्यांनी घेण्यात आली. त्यामुळे आता हा निर्णय विधानसभा निवडणुकीनंतर घेण्यात येणार आहे. त्यामुळे गवंडी यांच्या राजीनाम्याचा विषय तूर्त तरी टळला आहे आणि नूतन महापौरांची निवड लांबणीवर पडली आहे.   आगामी राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी निवडणूक कामात व्यस्त असणार आहेत. त्यामुळे पुढील तीन महिने महापौर, उपमहापौर निवडणूक घेऊ नये, असे अध्यादेशात म्हटले आहे.या अध्यादेशाचे दोन्ही बाजूने सोयीस्कर अर्थ लावले जात आहेत. अध्यादेशानुसार पुढील तीन महिने निवडणूक घेता येणार नाही, असा दावा काहीजण करत असले तरी दुसऱ्या गटाकडून ज्यांची मुदत संपली आहे, अशा महापालिकेतील महापौर निवडणुकीसाठी हा आदेश असून कोल्हापूर महापौर निवडणुकीसाठी लागू होत नाही कारण येथे मुदत संपलेली नाही, राजीनामा दिला आहे असल्याचा दावा केला जातो.नगरसचिवांचे मौनअध्यादेशाचा नेमका अर्थ काय, महापौर निवडणूक घेता येईल का, या प्रश्नावर नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी अध्यादेशाबाबत संभ्रम असल्याचे सांगून अधिक बोलण्यास टाळले आहे. गवंडी यांनी राजीनामा दिला तर विभागीय आयुक्त कार्यालय तसेच नगरविकास विभाग यांच्याकडून मार्गदर्शन मागवून घेऊ, असे सांगितले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर