मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे आढावा बैठक झाली. इचलकरंजीस सन २००५ व २०१९ मध्ये महापुरामुळे मोठा फटका बसला होता. यावर्षीही जादा पावसाचा अंदाज असल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नुकसान टाळण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन व्हावे. शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने या दुहेरी संकटात स्थलांतर व निवाऱ्याची व्यवस्था करताना कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यादृष्टीने नियोजन करण्याबाबत सूचना मांडल्या.
महापुराच्या काळात अनेक पत्रकार, सेवाभावी संस्था, इतर संघटना, सर्पमित्र, रेस्क्यू फोर्स यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी जीवाची पर्वा न करता कार्यरत असतात. या सर्वांसाठी सुरक्षा कवच देण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्षा स्वामी यांनी यावेळी केली. यावेळी मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, जल अभियंता सुभाष देशपांडे व नगर अभियंता संजय बागडे उपस्थित होते.
फोटो ओळी
१७०५२०२१-आयसीएच-०५
नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी पालकमंत्र्यांसमवेत मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली.