शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

इचलकरंजीतील वर्चस्ववादातून मावसभावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 11:51 IST

विशाळगड मार्गावरील मानोली (ता. शाहूवाडी) येथील संतोष मोहन तडाके (वय २८, रा. गुरुकनाननगर गल्ली, इचलकरंजी) याच्या निर्घृण खुनाचे रहस्य मंगळवारी उलगडले.

ठळक मुद्देइचलकरंजीतील वर्चस्ववादातून मावसभावाचा खूनविशाळगड मार्गावरील खुनाचे रहस्य उलगडले : चौघांना अटक

कोल्हापूर : विशाळगड मार्गावरील मानोली (ता. शाहूवाडी) येथील संतोष मोहन तडाके (वय २८, रा. गुरुकनाननगर गल्ली, इचलकरंजी) याच्या निर्घृण खुनाचे रहस्य मंगळवारी उलगडले.  इचलकरंजीतील वर्चस्ववादातून मावसभावानेच खून केल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासात उघडकीस आले.

या प्रकरणी मावसभाऊ संजय शरद शेडगे (वय ३३), त्याचे साथीदार आमिर ऊर्फ कांच्या आब्बास मुल्ला (२२), सुनील बाळू खोत (४३), सिद्धराम ऊर्फ सिद्धू शांताराम म्हेत्रे (२५, सर्व रा. लिंबू चौक, इचलकरंजी) यांना अटक केली.विशाळगडकडे जाणाऱ्या मार्गावर मानोली हद्दीत कोकण दर्शन पॉइंट येथे २० सप्टेंबरला २५ वयोगटातील अनोळखी तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करून आंबा घाटाच्या दरीत मृतदेह फेकून दिल्याचे उघडकीस आले होते. गळा चिरून निर्दयपणे खून झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना केल्या होत्या.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तीन पथके त्यावर काम करीत होती. मृताची ओळख पटल्यानंतर पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक निरीक्षक संतोष पोवार, विकास जाधव, भालचंद्र देशमुख व त्यांच्या पथकाने आरोपींची नावे निष्पन्न करण्यासाठी इचलकरंजी परिसरात मृत तडाकेचे नातेवाईक, शेजारी व मित्रपरिवाराकडे चौकशी केली.यावेळी पोलीस हवालदार विजय कारंडे व जितेंद्र भोसले यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, संतोषचा खून त्याचा मावसभाऊ संजय शेडगे व आणखी तीन साथीदारांनी केला आहे. त्यानुसार संशयित आमिर मुल्ला याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता खुनाचे रहस्य उलगडले.मुख्य सूत्रधार संजय शेडगे हा मृत संतोष तडाके याचा मावसभाऊ आहे. शेडगे राहत असलेल्या लिंबू चौक गल्लीत संतोष कुटुंबासह राहण्यास होता. तो नेहमी दारू पिऊन शेडगे व त्याच्या परिवारास, गल्लीतील लोकांना शिवीगाळ करून दहशत निर्माण करीत होता.

दारू पिण्यासाठी लोकांकडून पैसे काढून घेणे, शिवीगाळ करणे अशी कृत्ये करीत होता. त्याच्या दहशतीमुळे परिसरात त्याचे वर्चस्व वाढत होते. त्याचा राग शेडगेच्या मनात होता. त्याने स्वत:चे वर्चस्व वाढविण्यासाठी मावसभाऊ संतोषच्या खुनाचा बेत आखला.अशी केली बतावणीमुख्य सूत्रधार संजय शेडगे याने मावसभाऊ संतोषला ‘आपला मित्र कपिल याचा १९ सप्टेंबरला वाढदिवस आहे. तो विशाळगडला जाऊन साजरा करूया,’ म्हणून कारमध्ये बसविले. तेथून सर्वजण विशाळगड येथील कोकण दर्शन हॉटेलवर आले. रात्री अकराच्या सुमारास सर्वजण दारू प्यायले. त्यानंतर पिकनिक पॉइंट येथे लघुशंकेसाठी जाऊया म्हणून सर्वजण दरीच्या काठावर गेले.

या ठिकाणी बेसावध असलेल्या संतोषच्या डोक्यात पाठीमागून कोयत्याने वार करून त्याला खाली पाडले. चाकू व विळ्याने त्याचा गळा चिरून मृतदेह २०० फूट दरीत फेकून दिला. त्यानंतर चौघे संशयित मध्यरात्री दोनच्या सुमारास इचलकरंजीला आले. दुसऱ्या दिवशी पिकनिक पॉइंट परिसरात गुरे चारण्यास आलेल्या एका व्यक्तीला दरीपासून दहा फुटांवर मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली.केकच्या पाकिटावरून संशयितांचा मागविशाळगड येथील घटनास्थळावर केकचे पाकीट पोलिसांना मिळाले. हॉटेलवर रात्री कोण आले होते; तसेच इचलकरंजी परिसरातील केकच्या दुकानात पोलिसांनी चौकशी केली असता संजय शेडगे याने केक खरेदी केल्याचे सांगण्यात आले. केकच्या पाकिटामुळे अवघ्या ७२ तासांत संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर