शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: श्रावणानिमित्त अंबाबाई मंदिरातील मातृलिंग मंदिर भाविकांसाठी खुले, वर्षातून तीन वेळा घेता येते दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 13:26 IST

दर्शनासाठी दिवसभर भाविकांच्या रांगा

कोल्हापूर : कोसळत्या श्रावणधारा, हिरवाईने नटलेल्या वसुंधरेची साथ, भक्तीने श्रद्धेने भोळ्या शंकराला साद घालत कोल्हापूरकरांनी पहिल्या श्रावण सोमवारी शिवशंकराच्या ओम नम: शिवायचा जाप केला. रुद्राभिषेक, बेल, पांढरे फुले, वस्त्रमाळ, धूप, दीप, आरती, भजन, कीर्तन, अशा धार्मिक विधींनी मंगलमयी वातावरणात ओम नम: शिवायचा जाप करण्यात आला. अंबाबाई मंदिरातील श्री मातृलिंग मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. 

अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यावरील दुसऱ्या मजल्यात असणारे हे मातृलिंग मंदिर वर्षातून तीन वेळा खुले करण्यात येते. महाशिवरात्री, वैकुंठ चतुर्दशी आणि श्रावण सोमवारी या मंदिरात भाविकांना दर्शन घेता येते.हिंदू संस्कृतीत श्रावण महिन्याला व्रतवैकल्यांचा, शिवशंकराच्या आराधनेचा महिना मानला जातो. प्रत्येक श्रावण सोमवारी शिवलिंगाचे पूजन करून शिवमूठ म्हणून एक धान्य वाहिले जाते. कोल्हापूर हे शिवशक्तीचे स्थान असल्याने शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शिवमंदिरे आहेत.श्रावण सोमवारी येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांनी शिवलिंगाचे पूजन करून तांदूळ शिवमूठ वाहिले. इतरवेळी बंद ठेवले जात असलेले अंबाबाई मंदिराच्या वरच्या मजल्यावरील श्री मातृलिंग मंदिर श्रावण सोमवारी मात्र भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले. दर्शनासाठी दिवसभर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.मंगळवार पेठेतील श्री रावणेश्वर मंदिराला फुला-पानांची आकर्षक रोषणाई केली होती. ग्रामदैवत कपिलेश्वर मंदिर, अंबाबाई मंदिरातील अतिबलेश्वर, ऋणमुक्तेश्वर, वटेश्वर, उत्तरेश्वर, अशा सर्वच मंदिरांमध्ये दिवसभर धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.