शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

गणित, अर्थशास्त्राला लागला कस, सुमारे १६ हजार जणांनी दिली संयुक्त परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 18:53 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) रविवारी कोल्हापूर शहरातील ५६ उपकेंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्तपरीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर केंद्रावरून १६ हजार २४९ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली, तर १ हजार ७७७ जण गैरहजर राहिले. ‘गणित, अर्थशास्त्र विषयांवरील प्रश्न सोडविताना कस लागला,’ ‘वेळ कमी पडला’, अशा प्रतिक्रिया काही परीक्षार्थींनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्दे गणित, अर्थशास्त्राला लागला कस, सुमारे १६ हजार जणांनी दिली संयुक्त परीक्षा‘एमपीएससी’तर्फे शहरातील ५६ केंद्रांवर आयोजन

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) रविवारी कोल्हापूर शहरातील ५६ उपकेंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्तपरीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर केंद्रावरून १६ हजार २४९ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली, तर १ हजार ७७७ जण गैरहजर राहिले. ‘गणित, अर्थशास्त्र विषयांवरील प्रश्न सोडविताना कस लागला,’ ‘वेळ कमी पडला’, अशा प्रतिक्रिया काही परीक्षार्थींनी व्यक्त केल्या.या परीक्षेसाठी कोल्हापूर केंद्रावरून १८ हजार २६ उमेदवारांनी नोंदणी केली होती. परीक्षा उपकेंद्रांवर पोलीस कर्मचाऱ्यांनी उमेदवारांना तपासून आत सोडले. शहरातील विविध ५६ उपकेंद्रांवर सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत परीक्षा झाली.

१०० गुणांसाठी सामान्यज्ञान, चालू घडामोडी, गणित, मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, आदी विषयांवरील १०० प्रश्न विचारण्यात आले होते. वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी असे प्रश्नांचे स्वरूप होते.

परीक्षेचे केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालये उमेदवार आणि त्यांच्यासमवेत आलेल्या पालकांच्या गर्दीने फुलली. परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी आयोगाकडून विशेष निरीक्षक, भरारी पथक कार्यरत होते. जिल्ह्यातील महसूल विभागाचे २३०० अधिकारी, कर्मचारी या परीक्षेसाठी कार्यरत होते.

कोल्हापूरशी संबंधित प्रश्नया परीक्षेत कोल्हापूरशी संबंधित दोन प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले?, सन १९११ मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोणाला त्याचे अध्यक्ष नियुक्त केले; या प्रश्नांचा समावेश होता.

गणित, बुद्धिमत्ता, अर्थशास्त्र विषयांवरील प्रश्नांची काठिण्यपातळी अधिक होती. उर्वरित पेपर चांगला होता.- अजित पाटील, बोलोली (ता. करवीर)

बुद्धिमत्ता, गणित विषयावरील प्रश्न सोडविताना कस लागला. हे प्रश्न सोडविताना वेळ कमी पडला.- स्नेहल पाटील, चंदगड 

 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाkolhapurकोल्हापूर