शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील शेंडा पार्कात ८५ एकर जागेत माता-बालसंगोपन रुग्णालय; केंद्र शासनाकडून ३४ कोटींचा निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 12:14 IST

या रुग्णालयासाठी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता

कोल्हापूर : ‘केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने कोल्हापुरात एक अद्ययावत व प्रशस्त असे माता व बालसंगोपन रुग्णालय उभारले जाणार असून त्यासाठी ३४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. शंभर बेडचे हे रुग्णालय होणार आहे. या रुग्णालयामुळे जिल्ह्यातील माता- बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल’, अशा विश्वास खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला.येथील शेंडापार्कातील मेडिकल कॉलेजच्या आवारातील ८५ एकरातील प्रशस्त जागेमध्ये या रुग्णालयाचे भूमिपूजनही शुक्रवारी झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.खासदार मंडलिक म्हणाले, या रुग्णालयासाठी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. त्याच्या मंजुरीसाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया, आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या रुग्णालयामुळे कोल्हापूरच्या आरोग्य सुविधांमध्ये भर पडणार असून माता व बालकांना उत्कृष्ट व जलद आरोग्य सुविधा मिळू शकतील. या रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे. कोरोनाच्या काळात मतदारसंघातील जनतेच्या आरोग्यासाठी खासदार निधी व मंडलिक फाउंडेशनमार्फत दोन कोटींहून अधिक निधी दिला आहे’, असे खासदार मंडलिक यांनी यावेळी सांगितले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी स्वागत केले. राहुल सूर्यवंशी यांनी आभार मानले. यावेळी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीष कांबळे, आरोग्य उपसंचालक डॉ. प्रेमचंद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल