२०११ च्या निवडणुकीनंतर तब्बल साडेसात वर्षे किशोरी आवाडे या नगराध्यक्षा होत्या. त्यानंतर मेघा चाळके, रत्नप्रभा भागवत, शुभांगी बिरंजे, सुप्रिया गोंदकर आणि २०१६ नंतर सलग पाच वर्षे अलका स्वामी, असे गेली बारा वर्षे इचलकरंजी नगरपालिकेत नगराध्यक्ष पदावर सतत महिलाराज आहे.
गत निवडणुकीची स्थिती
२०११ ची लोकसंख्या विचारात घेऊन २०१६ ची निवडणूक झाली. त्यामध्ये दोन लाख ९२ हजार ६० लोकसंख्या व दोन लाख १४ हजार ७९५ मतदारसंख्या होती. ३१ प्रभाग व ६२ नगरसेवक होते. त्यामध्ये मागासवर्गीय ६ (३ महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग १७ (९ महिला) व खुला ३९ (१९ महिला) अशी स्थिती होती. यंदाही २०११ चीच लोकसंख्या गृहीत धरल्यास नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांची वाढीव संख्या पाहता किरकोळ बदल होऊ शकतात.
गत निवडणुकीतील पक्षीय बलाबल
कॉँग्रेस - १८ (१ स्वीकृत) (आवाडे गट १६, कॉँग्रेस ३) भाजप १४, १ नगराध्यक्ष (१ स्वीकृत) राजर्षी शाहू आघाडी ९ (१ स्वीकृत) ताराराणी आघाडी - ११ (१ स्वीकृत) राष्ट्रवादी जांभळे गट - ७ (१ स्वीकृत) शिवसेना - १ अपक्ष - २
जनताभिमुख कारभारात अपयश
यावेळी पक्षश्रेष्ठींना सत्ता टिकविण्यात यश आले असले तरी जनताभिमुख कारभारात अपयश आले आहे. कृष्णा योजनेची गळती कायम आहे. वारणा योजना बारगळली, तर दूधगंगा योजना प्रलंबित आहे. भुयारी गटारीचे काम थांबले आहे. रस्ते करणे व खोदणे या वारंवारच्या कारभाराबद्दल संताप. एकूणच कामकाजाबद्दल नाराजीचा सूर.
फोटो ओळी २१०८२०२१-आयसीएच-०३ २१०८२०२१-आयसीएच-०४ नगरपालिका इमारत