शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

Kolhapur: प्राधिकरणातील ४२ गावांचा एप्रिलपर्यंत ‘मास्टर प्लॅन’ करा; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 13:09 IST

दोषींवर कारवाई करण्याचे आदेश

कोल्हापूर : प्राधिकरणाने चांगला आराखडा करून शहरालगतच्या ४२ गावांमध्ये विकास करणे आवश्यक होते; पण याकडे प्राधिकरणाने दुर्लक्ष केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी अहवालातील दोषींवर कारवाई करा, कामे वेळेत पूर्ण करा, अन्यथा कारवाई करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना बदला अशा सक्त सूचना सोमवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. यापुढील बैठकीत प्राधिकरणाने लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ४२ गावांचा मास्टर प्लॅन करून त्याचे सादरीकरण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करा, असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी महसूल डॉ. संपत खिलारी उपस्थित होते. प्राधिकरणचे सदस्य सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार चव्हाण यांनी सादरीकरण केले. ‘लोकमत’ने या कार्यालयातील भोंगळ कारभाराची सडेतोड वृत्तमालिका लिहून पर्दाफाश केला होता.आमदार अमल महाडिक व चंद्रदीप नरके यांनी पुढील तीन महिन्यांत प्राधिकरण कार्यालयाच्या कामाला गती द्यावी, अशी सूचना केली. संजयकुमार चव्हाण यांनी करवीरमधील ३७ व हातकणंगलेमधील ५ अशा ४२ गावांसाठी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे. प्राधिकरणाचे एकूण क्षेत्र महापालिका वगळून १८६.१३ चौरस किलोमीटर. आहे. समाविष्ट ४२ गावांत येत्या काळात दिलेल्या सूचनांनुसार सर्व बाबींचा विचार करून पुढील उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले.पुढील २०० वर्षांचा विचार करून मास्टर प्लॅन कराअनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा अहवाल सादर करा, ४२ गावांतील सार्वजनिक जागांमधून उत्पन्न कसे घेता येईल याचे नियोजन करा. यापुढे दर महिन्याला प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल. अनधिकृत कामे थांबविणे, नवीन कामांना मंजुरी, संनियंत्रण यासह नव्याने विकासात्मक कामे हाती घ्या. पुढील २०० वर्षांचा विचार करून मास्टर प्लॅन करताना अनुभवी व तांत्रिकदृष्ट्या सक्षम संस्थेची मदत घ्या.कर्मचारी भरती करा..मंत्री आबिटकर यांनी प्राधिकरण कार्यालयाला मंजूर पदसंख्येनुसार सर्व रिक्त पदांची भरती करा. सध्या फक्त ११ जण कार्यरत असून, १६ जागा रिक्त आहेत. गरज पडल्यास कंत्राटी पदभरती करून अनुभवी व कौशल्य असलेल्या व्यक्तींची नियुक्ती करण्यास सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरguardian ministerपालक मंत्रीPrakash abitkarप्रकाश आबिटकर