शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

पिलावरेवाडी येथे भूस्खलन होऊन शेती पिकाचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2022 13:56 IST

अतिरीक्त पावसाचा परिणाम ;गतसाल ही या गावात झाले होते भुस्खलन

लोकमत न्यूज नेटवर्कधामोड :  पिलावरेवाडी ( ता. राधानगरी ) येथे गेल्या दोन आठवडयापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील  जनजीवन पूर्णपणे विस्कळीत करून टाकले आहे . त्यातच या पावसाने पिलावरेवाडी गावानजीक 'घोळ ' नावाच्या शेतात मोठे भुस्खलन होऊन शिवारातील भात शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे . जवळपास २ते २ .५हेक्टर क्षेत्रावरील भात पिक घसरत जाऊन पिक गडप झाले आहे . या पावसाचा अधिक फटका हा नदी-नाले,ओढ्याशेजारी असणाऱ्या शेतीला मोठ्या प्रमाणात बसला आहे . नदी काठाची शेती पाण्याच्या प्रवाहाने अक्षरशः धुवून नेली असून. नदीकाठावर चे विद्युत पंप विहिरी यांचेही नुकसान झालेआहे.

       केळोशी बु॥नजीकच्या पिलावरेवाडी येथील 'घोळ ' नावाच्या शिवारा दरम्यान मोठया प्रमाणात भूस्खलन होऊन डोंगराचा बहुतांशी भाग तिन ते चार  फुटाने खाली सरकला आहे . त्यामुळे येथील चंदर रामा पिलावरे, विलास रामा पिलावरे व प्रकाश भाऊ पिलावरे या शेतकऱ्यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . या तीन शेतकऱ्यांची जवळपास अडीच हेक्टर जमीन तीन ते चार फुटाणे खचून ओढ्याकडील बाजूला सरकत गेली आहेत . तर या खचलेल्या जमिनीचा काही भाग दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शिवारात धुवून गेल्याने त्यांच्याही शेतीचे नुकसान झाले आहे . या परिसरात गेल्या आठ दिवसात जोरदार पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांच्या नदी नजीकच्या विहिरीव विद्युत पंपांचेही नुकसान झाले आहे .

       सदर ठिकाणी तात्काळ भेट देऊन तलाठी रणजीत पाटील,सरपंच के .एल. पाटील , ग्रामसेवक श्री . बागडी ,कृषी सहाय्यक तानाजी परीट , यु .जी .नाधवडेकर , कोतवाल संतोष पाटील, पोलास पाटील शशिकांत दिघे पंचनाम करून पुढील कार्यवाही साठी पाठवला आहे .चौकट- गतसाली .या परिसरात ८९५ मिलिमीटर इतका रेकॉर्ड ब्रेक पाऊस एका दिवसात पडल्यामुळे या परिसरातील माळवाडी ,केळोशी, आपटाळ,माळवाडी, शिंदेवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते . यावर्षी अशाच पद्धतीचे भूस्खलन झाल्याने शेतकरी वर्गामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .