शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News Kolhapur: मास्कमुळे बचत गटांना मिळाली उभारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 05:03 IST

सुरुवातीच्या काळात मास्क, सॅनिटायझरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढल्याने त्यांची टंचाई जाणवू लागली. सर्वत्र लॉकडाऊन झाल्यानंतर तर परिस्थिती आणखी गंभीर झाली.

समीर देशपांडे कोल्हापूर : कोरोनाच्या या भयानक संकटावेळीही कोल्हापूर जिल्ह्यातील महिला बचत गटांनी ५० लाख रुपयांच्या मास्कची विक्री केली आहे. ग्रामपंचायतींपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत विविध संस्थांना त्यांनी हा पुरवठा केला आहे. गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरामध्ये प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीच्या काळात मास्क, सॅनिटायझरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढल्याने त्यांची टंचाई जाणवू लागली. सर्वत्र लॉकडाऊन झाल्यानंतर तर परिस्थिती आणखी गंभीर झाली. मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बचत गटांच्या माध्यमातून मास्क निर्मिती करण्यासाठी सूचना दिल्या. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास यांनी जिल्'ातील सर्व बचत गटांना सक्रिय करण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा केली.स्थानिक पातळीवर बाजारपेठेतून कापड पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील बचत गटातील महिलांना शिवणकामाचे कौशल्य प्राप्त असल्याने मोठ्या प्रमाणावर लागणाºया मास्कचा पुरवठा त्यांनी करावा यासाठी त्यांना उद्युक्त करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील २८८ बचत गटातील १२५४ महिलांनी कंबर कसली आणि मास्कची निर्मिती करण्याच्या कामास सुरुवात केली.गावपातळीवरही मास्कची मागणी वाढू लागल्याने ग्रामपंचायती, मेडिकल स्टोअर्स यांच्याकडून बचत गटांनी तयार केलेल्या मास्कना मागणी वाढू लागली. अनेक स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळांनी हे मास्क विकत घेऊन गरजूंना वितरित केले. या महिलांचा उत्साह पाहिल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानेही २० लाख रुपयांच्या मास्कची आॅर्डर या महिला बचत गटांना दिली आहे. अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनीही बचत गटांकडून ही खरेदी केलीआहे.अशा प्रकारे गुरुवारअखेर चार लाख ३२ हजार ७९१ मास्क बचत गटाच्या महिलांनी तयार केले असून, त्याची एकूण किंमत ५० लाख ७७ हजार ६१० इतकी होते. या कोरोनाच्या काळातही या महिलांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.>राज्यातील महिला बचत गटांनी लॉकडाउनच्या काळातही मास्कसह अन्य वस्तू तयार कराव्यात, असे आवाहन मी केले होते. माझ्याच कोल्हापूर जिल्ह्यातील महिला बचत गटाच्या माझ्या भगिनींनी ५० लाख रुपयांच्या मास्कची विक्री केली. राज्याचा ग्रामविकास मंत्री म्हणून माझ्यासाठी हे अभिमानास्पद आहे.- हसन मुश्रीफ,ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस