शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहीद संदीप बाबासो भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 21:20 IST

संदीप हे गेली वीस वर्षे सैन्यदलात कार्यरत होते.आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली.

खोची: नरंदे(ता.हातकणंगले)येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले संदीप बाबासो भोसले(वय ३८)यांना वीरमरण प्राप्त झाले.पुणे येथील सीएएफव्हीडी मध्ये ते सैन्यसेवा बजावत होते.आजारी असल्याने गेली महिनाभर त्यांच्यावर सैन्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.आज सकाळी त्यांचे निधन झाले.हजारो ग्रामस्थांच्या उपस्थीतीत दुपारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले.पत्नी वसुंधरा,लहान मुलगी वैष्णवी(वय ११) व मुलगा समर्थ (वय ४)यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

संदीप हे गेली वीस वर्षे सैन्यदलात कार्यरत होते.आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली.दुपारी तीनच्या सुमारास त्यांचे पार्थिव गावात घरी आणण्यात आले. कुटुंबीयांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर ग्रामपंचायत चौकात ग्रामस्थांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.त्यानंतर सजविलेल्या ट्रॅक्टर मधून त्यांची अंत्य यात्रा  काढण्यात आली.अमर रहे अमर रहे वीरजवान संदीप भोसले अमर रहे..वीरजवान तुझे सलाम..भारत माता की जय..अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

स्मशानभूमी येथे शोकसभेत मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.त्यानंतर भारतीय सैन्य दलाकडून हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.त्यानंतर मुलगा पार्थ व भाऊ अमोल यांच्या हस्ते भडाग्नी देण्यात आला.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,लहान मुलगा,आई,भाऊ असा परिवार आहे.आमदार राजू आवळे, माजी खासदार निवेदिता माने,प्रशिक्षणार्थी तहसीलदार सुहास गाडे, सुभेदार कैलास मिलके,डी.के.कदम,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अशोकराव माने, प्रतापराव देशमुख, माजी उपसभापती राजकुमार भोसले,पी.आर.भोसले,सरपंच पूजा कुरणे,शंकर शिंदे,पोलीस निरीक्षक महादेव तोंदले,यशवंत उपराटे, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जाधव,तलाठी डी.के.कदम,प्रकाश गुरव,विजय पाटील,नीतीन पाटील,संजय माने,दिनकर घाडगे,संजय खोत आदींनी श्रद्धांजली वाहिली.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर