शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती :असुविधांबाबत माथाडी कामगार आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 11:45 IST

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये सुविधा द्या, या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा माथाडी कामगार युनियनच्या वतीने सोमवारी समिती प्रशासनाला दिले. कांदा-बटाटा मार्केटमध्ये पिण्याच्या पाण्याच्या सोईसह इतर सुविधा तातडीने देण्याची मागणी त्यांनी लावून धरली.

ठळक मुद्देबाजार समिती :असुविधांबाबत माथाडी कामगार आक्रमककांदा-बटाटा विभागात पाण्यासह इतर सुविधा देण्याची मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये सुविधा द्या, या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा माथाडी कामगार युनियनच्या वतीने सोमवारी समिती प्रशासनाला दिले. कांदा-बटाटा मार्केटमध्ये पिण्याच्या पाण्याच्या सोईसह इतर सुविधा तातडीने देण्याची मागणी त्यांनी लावून धरली.कांदा-बटाटा मार्केटमध्ये गेले अनेक दिवस पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. त्याचबरोबर शौचालय, बाथरूमही नसल्याने येथे येणाऱ्या शेतकऱ्यांबरोबरच हमाल, तोलाईदारांची गैरसोय होते. याबाबत माथाडी संघटनेने अनेकवेळा समिती प्रशासन व अडत्यांकडे मागणी केली होती; पण त्याकडे दुर्लक्ष केले होते.

सोमवारी माथाडी कामगारांनी मागण्यांचे निवेदन समितीचे सभापती बाबासो लाड व सचिव मोहन सालपे यांना दिले. यावेळी समितीचे संचालक परशुराम खुडे, माथाडी कामगार संघटनेचे नेते बाबूराव खोत, आकाराम केसरे, दीपक पाटील यांच्यासह माथाडी कामगार उपस्थित होते.

आठ दिवसांत पिण्याच्या पाण्याची सोयकांदा-बटाटा मार्केटमध्ये समितीच्या वतीने आठ दिवसांत पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली जाईल. येथे विंधनविहीरीच्या माध्यमातून पाणी देण्याचे आश्वासन सभापती लाड यांनी दिले.

तर १ एप्रिलपासून कामबंद !वास्तविक स्वच्छतागृहाची सोय माथाडी कामगारांच्या संबंधित अडत दुकानदारांनी करायची आहे; पण त्यांच्याकडे मागणी करूनही ते दखल घेत नसल्याने माथाडी कामगार आक्रमक झाले आहेत. अडत दुकानदारांनी स्वच्छता गृहाची सुविधा दिली नाही, तर १ एप्रिलपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा माथाडी कामगार संघटनेने दिला.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर