शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल पावसाळ्यातच, अद्याप १७०० विकास संस्थांच्या निवडणुका प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 11:49 IST

राज्य शासनाने मार्चअखेर या संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचा आदेश दिला असला तरी प्रक्रिया राबवण्यासाठी द्यावा लागणारा वेळ पाहता सहकार विभागाला ते शक्य झाले नाही. यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने विभागातील १५ बाजार समित्यांचा बिगुल पावसाळ्यातच वाजणार, हे निश्चित आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : कोल्हापूर विभागात विकास संस्थांच्या निवडणुकांचा धडाका सुरू असला तरी अद्याप १,७०० संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. राज्य शासनाने मार्चअखेर या संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचा आदेश दिला असला तरी प्रक्रिया राबवण्यासाठी द्यावा लागणारा वेळ पाहता सहकार विभागाला ते शक्य झाले नाही. यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने विभागातील १५ बाजार समित्यांचा बिगुल पावसाळ्यातच वाजणार, हे निश्चित आहे.विकास संस्थांच्या निवडणुका घेऊनच बाजार समित्यांच्या निवडणूका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने सहकारी प्राधिकरणाने विकास संस्थांच्या निवडणुका प्राधान्याने घेण्यास सुरुवात केली. मार्चपर्यंत प्रलंबित विकास संस्थांच्या निवडणुका घेऊन एप्रिल, मेमध्ये बाजार समित्यांच्या निवडणुका घ्याव्यात, असा प्रयत्न प्राधिकरणाचा होता.मात्र, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील सुमारे तीन हजार विकास संस्था निवडणुकीस पात्र होत्या. यातील बहुतांशी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध होणार असल्या तरी त्यांच्यासाठी प्रारूप यादीपासून उमेदवारी अर्ज माघारीपर्यंतची प्रक्रिया राबवावीच लागते. त्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी जातो. त्यात मनुष्यबळाची मर्यादा असल्याने अडचणी अधिक आहेत.तरीही आतापर्यंत विभागात २ हजार संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अजून जवळपास १,७०० संस्थाची निवडणूक व्हायची आहे. यातील बहुतांशी संस्थांची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, सगळ्या संस्थांची प्रक्रिया पूर्ण होण्यास अजून दोन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे विभागातील १५ बाजार समित्यांच्या बिगुल पावसाळ्यातच वाजणार, हे निश्चित आहे. तोपर्यंत अशासकीय मंडळच समित्यांचा गाडा हाकणार आहे.

बँका, पतसंस्थांच्या निवडणुका ठप्प

विकास संस्थांच्या निवडणुका प्राध्यानाने घेण्याचे आदेश प्राधिकरणाचे आहेत. त्यामुळे इतर बँका, पतसंस्थांच्या निवडणुका ठप्प आहेत. विकास संस्थांबरोबर त्यांचीही प्रक्रिया सुरू करण्याबाबत प्राधिकरणाच्या पातळीवर विचार सुरू आहे.

मराठवाडा, विदर्भातील संस्थांकडे निवडणूक निधीच नाही

मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांतील २५ टक्के संस्थांकडे निवडणुकीसाठी निधीच नाही. त्यामुळे या संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या कशा? असा पेच सहकारी निवडणूक प्राधिकरणासमोर आहे.

जिल्हानिहाय निवडणुकीस पात्र समित्याकोल्हापूर - ३सातारा- ५सांगली - ७

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक