शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
4
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
5
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
6
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
7
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
8
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
9
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
10
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
11
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
12
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
13
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
14
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
15
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
16
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
17
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
18
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
19
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
20
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया

पोलिसांना मार्च एंडिंगचे ‘टार्गेट’ दिले आहे का ?

By admin | Updated: March 20, 2017 23:32 IST

समस्यांचा पाढा : विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या जनता दरबारात नागरिकांचा सवाल

इचलकरंजी : पोलिस खात्याने पोलिस कर्मचाऱ्यांना मार्च एंडिंगचे ‘टार्गेट’ दिले आहे का? असा सवाल करीत शहरातील वाहतुकीच्या समस्या, चौकात उभे राहून टिंगलटवाळी करणाऱ्या टोळ्या, ओपन बार, हातगाड्यांचा त्रास, अशा विविध समस्यांचा पाढाच नागरिकांनी मांडला.इचलकरंजी पोलिस दलाच्यावतीने सोमवारी आयोजित विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या जनता दरबारात उपस्थित नागरिकांनी हे प्रश्न मांडले. यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख महादेव तांबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. नागरिकांच्या प्रश्नांना सामोरे जात नांगरे-पाटील यांनी नागरिकांकडून मांडण्यात आलेल्या अडचणी मार्च एंडपर्यंत निर्गत कराव्यात, असे आदेश पोलिस अधिकाऱ्यांना दिले; अन्यथा गय केली जाणार नाही, असा दमही भरला. पोलिस खात्यांतर्गत पोलिस ठाण्यांच्या वार्षिक तपासणीसाठी नांगरे-पाटील इचलकरंजीत आले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील पोलिस खाते ‘स्मार्ट’ बनावे, अशा सूचना दिल्या असल्याचे सांगत ‘स्मार्ट’ या शब्दाची व्याख्या सांगितली. त्यामध्ये पोलिस जागरूक असणे, समाजाप्रती संवेदनशील, खात्यासाठी आवश्यक नवनवीन सोयी-सुविधा घेणे. यामध्ये मोबाईल, वाय-फाय, संगणक प्रणाली, सीसीटीव्ही, असे आवश्यक बदल करून घेत पोलिसांनी त्याचा वापर शिकून घ्यावा, अशा सूचना दिल्या असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनी कडक वडिलांच्या भूमिकेत असावे. सावत्र आईच्या भूमिकेत असू नये. सर्व सामाजिक प्रश्न सुटण्यासाठी नागरिकांनी सहभाग घेणे आवश्यक असल्याची नांगरे-पाटील यांनी अपेक्षा व्यक्त केली.जिल्हा पोलिसप्रमुख तांबडे यांनी लोकसंख्या, वाहनसंख्या वाढल्याने वाहतुकीच्या समस्या वाढल्याचे सांगितले. समस्यांना आळा घालण्यासाठी घरातूनही प्रबोधन होण्याची गरज व्यक्त केली. तर महिला अत्याचाराबाबत बोलताना स्त्रीचे नाते बदलले की ती बदलते, असे न करता सासूने आई व सुनेने मुलगी बनावे. त्यामुळे बरेचसे घरगुती अत्याचाराचे प्रश्न संपुष्टात येतील.स्वागत व प्रास्ताविक अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी केले. नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी, पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे, सर्व पोलिस न्$ि$िारीक्षक, पोलिस अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)नागरिकांनी या समस्या मांडल्याशहरात ओपन बारचा प्रश्न गंभीर, हातगाड्यांवर खाण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या पार्किंगचा प्रश्न, चिकन-मटनचा कचरा ओढ्यात टाकला जातो, ओव्हरलोड वाहतूक, असे विविध प्रश्न नागरिकांतून मांडण्यात आले. नांगरे-पाटील यांनी हे प्रश्न आय. जी. स्तरावरील नसल्याचे सांगत स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना समस्या सोडविण्यासाठी सूचना दिल्या.