शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठीचा गौरव घराघरांतून केला जावा :डॉ. डी.टी. शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 18:09 IST

literature Kolhapur- मराठी ही केवळ भाषा नाही, तर आपले साहित्य आणि संस्कृती आहे, तिला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचे असेल, तिचा गौरव करायचा असेल, तर त्याची सुरुवात घराघरांतून व्हायला हवी. भलेही विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकत असेल; पण त्याची या साहित्यातील विपुल संपदेशी असलेली नाळ तुटता कामा नये, यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे मराठीचा गौरव घराघरांतून केला जावा :डॉ. डी.टी. शिर्के दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे ग्रंथ पुरस्कार वितरण

कोल्हापूर : मराठी ही केवळ भाषा नाही, तर आपले साहित्य आणि संस्कृती आहे, तिला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचे असेल, तिचा गौरव करायचा असेल, तर त्याची सुरुवात घराघरांतून व्हायला हवी. भलेही विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकत असेल; पण त्याची या साहित्यातील विपुल संपदेशी असलेली नाळ तुटता कामा नये, यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केले.दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने शनिवारी झालेल्या ग्रंथ पुरस्कार प्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सभेचे अध्यक्ष डॉ. विजय चोरमारे, वि.द. कदम, भीमराव धुळुबुळू, गौरी भोगले, दि.बा. पाटील आदींची उपस्थिती होती.

यावेळी ज्येष्ठ कवी अशोक भोईटे, साहित्यिक माधव कामत, विजय तेंडुलकर राज्य वाङ्‌मय पुरस्कारप्राप्त अनुप जत्राटकर, महात्मा ज्योतीराव फुले राज्य वाङ्‌मय पुरस्कारप्राप्त डॉ. व्ही.एन. शिंदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.शिर्के म्हणाले, वाचन संस्कृती कमी होत चालल्याची टीका होत असली तरी मला असे वाटत नाही. आजची नवी पिढी मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती करत असून झपाटून लेखन करत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालयात कोणत्या प्रकारचे साहित्य असावे, याची शिफारस अभ्यास मंडळाने करावी, असे झाल्यास विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार साहित्य पोहोचवता येईल.यावेळी अशोक भोईटे यांनी कविता सादर केली.

कार्यक्रमात डॉ. सतीश कुमार पाटील, बजरंग देशमुख, वासंती मेरू, डॉ. अरुण शिंदे, डॉ. सुप्रिया आवारे, चंद्रशेखर कांबळे, वर्षा चौगुले यांना दक्षिण महाराष्ट्र साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बाळासाहेब पाटील, स्वाती शिंदे-पवार, जगजित महावंश, मंगेश मंत्री, विठ्ठल सदामते, लवकुमार मुळे, सुनील देसाई, गौतम कांबळे, उमेश सूर्यवंशी, विश्वास सुतार यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. विनोद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह गोविंद पाटील यांनी आभार मानले. 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर