शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मराठी नाट्य परिषदेला राजकारणाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 17:31 IST

Natak Politics Kolhapur- संपूर्ण जगाला कोरोनाची लागण झालेली असताना इकडे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला मात्र राजकारणाची लागण झाली आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना मनमानी कारभाराच्या कारणास्तव कार्यकारिणीने पदच्युत केल्यानंतर कोर्टकचेऱ्या सुरू आहे. त्यात रंगभूमी दिनानिमित्त आयोजित शनिवारची सभा रद्द करण्यात आल्याने नियामक मंडळ सदस्यांनी कांबळी व प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांचा जाहीर निषेध केला आहे.

ठळक मुद्देमराठी नाट्य परिषदेला राजकारणाची लागण पदच्युत, कोर्टकचेऱ्या आणि निषेध

कोल्हापूर : संपूर्ण जगाला कोरोनाची लागण झालेली असताना इकडे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला मात्र राजकारणाची लागण झाली आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना मनमानी कारभाराच्या कारणास्तव कार्यकारिणीने पदच्युत केल्यानंतर कोर्टकचेऱ्या सुरू आहे. त्यात रंगभूमी दिनानिमित्त आयोजित शनिवारची सभा रद्द करण्यात आल्याने नियामक मंडळ सदस्यांनी कांबळी व प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांचा जाहीर निषेध केला आहे.मनमानी कारभार, मर्जीतल्यांनाचा परिषदेतर्फे अर्थसहाय्य, कार्यकारिणीला विश्वासात न घेणे या कारणांवरुन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १८ फेब्रुवारीच्या नियामक मंडळ सभेत अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना पदच्युत करण्यात आले. त्यांच्या जागी नरेश गडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र कांबळी यांनी न्यायालयात दाद मागितली जो अर्ज फेटाळण्यात आला.

या कालावधीत प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी परिषदेच्या लेटरहेडवर विश्वस्तांना मनाहानीकारक पत्र पाठवले आहे. राज्यातील नाट्यगृह सुरू झाली असताना मराठी रंगभूमीच्या मध्यवर्ती संघटनेचे यशवंत नाट्य संकुल फायरची परवानगी नाही असे सांगून बंद ठेवले आहे. असे असेल तर अडीच तीन वर्षात फायरचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता नाट्यसंकुल कसे चालवले हा प्रश्न आहे.नियामक मंडळ सदस्यांनी घटनेप्रमाणे मागणी करूनही प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी सभा ठेवण्यास टाळाटाळ केली. मात्र कांबळी यांच्या विरोधात निकाल गेल्याने पोंक्षे यांनी १७ फेब्रुवारीला परिषदेची सभा २७ मार्च रोजी होईल असे जाहीर केले. ही सभा हंगामी अध्यक्ष नरेश गडेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार होतील. ज्यात आधीच्या सभेच्या निर्णयांची अंमलबजावणी होणार होती. या कारणास्तव पोंक्षे यांनी शनिवारची सभा कोरोनाचे कारण सांगून रद्द केली. या प्रकारांमुळे नियामक मंडळाच्या सदस्यांनी कांबळी व पोंक्षे यांचा जाहीर निषेध केला आहे. 

टॅग्स :NatakनाटकPoliticsराजकारणkolhapurकोल्हापूर