शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक सरकारने अखेर मराठी साहित्य संमेलनाला परवानगी दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 19:15 IST

राजकीय दृष्ट्या सीमावासी मराठी भाषिकांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्नाटकी सरकारने आता संस्कृती क्षेत्रातही दडपशाही अवलंबली आहे. रविवारी कुद्रेमानी आणि गर्लगुंजी येथे आयोजित मराठी साहित्य संमेलन होऊ देणार नाही अशी भूमिका कर्नाटकी पोलिसांनी घेतली असून आयोजकांवर दबाव टाकण्यात येत आहे.

ठळक मुद्देमराठी साहित्य संमेलन होऊ देणार नाहीसीमा भागातील पोलिसांची वक्रदृष्टी

बेळगाव : राजकीय दृष्ट्या सीमावासी मराठी भाषिकांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्नाटकी सरकारने आता संस्कृती क्षेत्रातही दडपशाही अवलंबली आहे. रविवारी कुद्रेमानी आणि गर्लगुंजी येथे आयोजित मराठी साहित्य संमेलन होऊ देणार नाही अशी भूमिका कर्नाटकी पोलिसांनी घेतली असून आयोजकांवर दबाव टाकण्यात येत आहे. सीमाभागात मराठी कार्यक्रम होऊ देऊ नका, असा आदेश गृहमंत्रालयाकडून आल्यामुळे साहित्य संमेलन नाही होऊ देणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. मात्र, सायंकाळी संमेलनाला परवानगी दिली आहे. कुद्रेमानी येथे गेल्या 14 वर्षांपासून मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्यात येते. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यावर विचार मंथन होते. पण आता साहित्य संमेलने कर्नाटकी पोलिसांना खुपत असून त्यांनी या वर्षी कोणत्याही प्रकारे साहित्य संमेलन होऊ देणार नाही, अशी धमकी आयोजकांना दिली होती. कुद्रेमानी आणि इदलहोंड येथे दोन साहित्य संमेलने आयोजित करण्यात आली आहेत. इदलहोंड येथें 17 वे गुंफण साहित्य संमेलन तर कुद्रेमानी मराठी साहित्य संमेलन आहे. इदलहोंड येथे गुंफण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस तर कुद्रेमानी येथील संमेलनाचे अध्यक्ष मुंबई येथील साहित्यिक अशोक बागवे अध्यक्ष असणार आहेत.दोन्ही साहित्य संमेलनातून मराठीचा जागर केला जातोय यंदा मात्र पोलिसांनी परवानगीचे निमित्त पुढे करत साहित्य संमेलनावर गदा आणण्याचा प्रयत्न चालू केला होता.दोन्ही साहित्य संमेलनाच्या आयोजकांना पोलिसांनी संमेलन भरवू नका, असे सांगत दबाव वाढवण्यासाठी सुरूवात केली होती.कुद्रेमानी आणि खानापूर मधील इदलहोंड मध्ये उद्या रविवारी संमेलन होणार आहे. साहित्य संमेलनामुळे कन्नड-मराठी असा वाद वाढत असून त्यामुळे कोणत्याही प्रकारे मराठी साहित्य संमेलने होऊ देऊ नका, असा आदेश गृह खात्याने दिला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहल्ली यांनी साहित्य संमेलनांच्या आयोजकांबाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे आम्ही साहित्य संमेलन होऊ देणार नाही, अशी माहिती डीसीपी सीमा लाटकर यांनी दिली. मराठी संस्कृती चिरडण्याच्या कर्नाटकी कृत्याचा सीमाभागात निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :belgaonबेळगावMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनkolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक