शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
5
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
7
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
8
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
9
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
10
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
11
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
12
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
13
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
14
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
15
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
16
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
17
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
18
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
19
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
20
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

Maratha Reservation : मग प्रश्न का सुटत नाही? राजू शेट्टी यांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 11:30 IST

राज्यातील सर्व पक्ष, संघटनांचा पाठिंबा मराठा आरक्षणाला असताना मग प्रश्न का सुटत नाही, असा प्रतिप्रश्न करत खासदार राजू शेट्टी यांनी आता मराठा समाजातील युवकांचा संयम सुटला आहे, त्यासाठी तातडीने सरकारने आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, असे आवाहन केले.

ठळक मुद्दे मग प्रश्न का सुटत नाही? राजू शेट्टी यांचा प्रश्न मराठा आरक्षण प्रश्न तातडीने निकाल काढावा

कोल्हापूर : राज्यातील सर्व पक्ष, संघटनांचा पाठिंबा मराठा आरक्षणाला असताना मग प्रश्न का सुटत नाही, असा प्रतिप्रश्न करत खासदार राजू शेट्टी यांनी आता मराठा समाजातील युवकांचा संयम सुटला आहे, त्यासाठी तातडीने सरकारने आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, असे आवाहन केले.ऐतिहासिक दसरा चौकात गेले सात दिवस मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नावर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास खासदार राजू शेट्टी यांनी भेट देऊन या आंदोलनास पाठिंबा दिला.

यावेळी माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी आमदार संजय घाटगे, करवीर पंचायत समितीचे सभापती राजू सूर्यवंशी, भगवान काटे, काँग्रेसच्या प्रदेश महिला सरचिटणीस अ‍ॅड. सुषमा रोटे, आदींनीही आपल्या भाषणात शासनाला टिकेचे लक्ष बनवले.खासदार शेट्टी म्हणाले, मी फक्त मराठा समाजाच्याच नव्हे तर इतरही समाजाचे प्रश्न संसदेत मांडले. हे प्रश्न शेतकऱ्याचे कुणबी पोरं म्हणून मी मांडले आहेत. संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात शांततेने मोर्चे काढल्यानंतरही शासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे; त्यामुळे युवकांचा संयम सुटणारच.

राज्यात सर्व पक्ष व संघटनांचा पाठिंबा असताना हा प्रश्न का सुटत नाही? असाही प्रश्न उपस्थित करून मराठा समाजातील युवकांनी हा प्रश्न संयमाने हाताळावा व शाहू, फुले, आंबेडकर यांची चळवळ पुढे न्यावी, असेही आवाहन केले.

समाजाला शासनाने फसविले : जयवंतराव आवळेमाजी मंत्री जयवंतराव आवळे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत झोपेचे सोंग करणाऱ्या या भाजप सरकारला जागे करणे अवघड झाले आहे; त्यामुळे हे आंदोलन तीव्र केल्याशिवाय पर्याय नाही. वेगवेगळ्या आयोगांची नावे सांगून मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित ठेवून शासनाकडून मराठा समाजाची फसवणूक सुरू आहे. मराठा समाजाची होत निघालेली दुरवस्था पाहता या समाजाची आरक्षणाची मागणी रास्त आहे, असेही ते म्हणाले.

शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा : संजय घाटगेमराठा समाजाला आरक्षणाबाबत आंदोलने करावी लागतात, ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असे सांगून माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, मराठ्यांचे आंदोलन ही सामूहिक एकी व ताकद आहे, त्यासमोर कोणाचेही चालणार नाही. समाजाला आरक्षण देणे गरजेचे आहे; त्यामुळे शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा.

दहा वर्षे काय केले : आंदोलकाचा शेट्टींना प्रश्नदसरा चौकातील आंदोलनाच्या व्यासपीठावर खासदार राजू शेट्टी बोलण्यास प्रारंभ करतानाच व्यासपीठासमोर उभारलेल्या एका दऱ्याचे वडगाव येथील आंदोलकाने खडा सवाल करून त्यांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्हीही दहा वर्षांत लोकसभेत मराठा आरक्षणाबाबत किती आवाज उठवला’ असा प्रश्न करताच एकच गोंधळ उडाला, तातडीने पोलीस व इतर कार्यकर्त्यांनी त्या आंदोलकास बाजूला नेले; पण त्यामुळे काहीवेळ वातावरण तंग बनले होते.

 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टी