शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
4
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
5
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
6
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
7
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
8
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
9
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
10
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
11
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
12
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
13
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
14
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
15
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
16
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
17
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
18
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
19
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

Maratha Reservation : कोल्हापुरात शिवाजी पेठेचे भगवं वादळ रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 17:18 IST

‘आता नाही माघार, आरक्षण घेणार’असा ठाम निर्धार करीत शिवाजी पेठेचे भगवे वादळ सोमवारी रस्त्यावर उतरले. भगवे झेंडे फडफडत ‘जय भवानी-जय शिवाजी’चा जयघोष करीत हा एल्गार मोर्चा साऱ्यांचा लक्षवेधी ठरला. मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास शिवाजी पेठेतील सर्व सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी पदाचा राजीनामा देण्याचीही घोषणा यावेळी केली. आरक्षण द्या, अन्यथा पेठेचा हा उद्रेक जिल्हाभरच नव्हे, तर राज्यभर परसेल, असाही इशारा सरकारला दिला.

ठळक मुद्देकोल्हापुरात शिवाजी पेठेचे भगवं वादळ रस्त्यावरआरक्षण न दिल्यास लोकप्रतिनिधी देणार राजीनामा

कोल्हापूर : ‘आता नाही माघार, आरक्षण घेणार’असा ठाम निर्धार करीत शिवाजी पेठेचे भगवे वादळ सोमवारी रस्त्यावर उतरले. भगवे झेंडे फडफडत ‘जय भवानी-जय शिवाजी’चा जयघोष करीत हा एल्गार मोर्चा साऱ्यांचा लक्षवेधी ठरला. मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास शिवाजी पेठेतील सर्व सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी पदाचा राजीनामा देण्याचीही घोषणा यावेळी केली. आरक्षण द्या, अन्यथा पेठेचा हा उद्रेक जिल्हाभरच नव्हे, तर राज्यभर परसेल, असाही इशारा सरकारला दिला.‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’ या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू असताना कोल्हापुरातून शिवाजी पेठेने सोमवारी मोर्चा काढून आपली ताकद दाखवून दिली. सकाळी महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते निवृत्ती चौकातील अर्धा शिवाजी पुतळ्याचे पूजन करून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. मोर्चात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा १५ फुटी अश्वारुढ पुतळा सहभागी होता.

मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चात ‘जय भवानी-जय शिवाजी’ असा जयघोष करीत ‘मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे...’, ‘आता नाही माघार आरक्षण घेणार’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात दहा महिलांच्या शिष्ठमंडळाने जिल्हाधिकाºयांकडे मागण्यांचे निवेदन सादर केले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यासपीठावर झालेल्या सभेत महापौर शोभा बोंद्रे, आमदार चंद्रदीप नरके, महेश जाधव, सई खराडे, रविकिरण इंगवले, सुजित चव्हाण, अजित राऊत, माजी आमदार सुरेश साळोखे, आदींची भाषणे झाली. यावेळी नगरसेविका तेजस्विनी सावंत, जयश्री चव्हाण, अजिंक्य चव्हाण, किरण नकाते, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, इंद्रजित बोंद्रे, दत्ताजी टिपुगडे, अजित चव्हाण, अजित नरके, अ‍ॅड. अशोकराव साळोखे, सुरेश जरग, राजू सावंत, बाबा महाडिक, अजय इंगवले, अशोक देसाई, राहुल इंगवले, आकाश नवरुखे, चंदर नवरुखे, गणेश खेडकर, संजय आयरेकर, आदी उपस्थित होते.

बाल शिवाजी, जिजाऊ, वासुदेवमोर्चात बाल शिवाजी, जिजाऊ, बाल संभाजी यांच्या वेशभूषेत लहान मुले घोड्यावर स्वार होऊन मोर्चात सहभागी झाली होती. टाळ व मृदुंगाच्या गजरात वासुदेवाची वेशभूषा केलेले आरक्षणाचा गजर करताना लक्ष वेधत होते. याशिवाय अनेक लहान मुलांनी बाल शिवाजींची वेशभूषा केली होती. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर