शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करणार, मंत्री हसन मुश्रीफांची ग्वाही

By संदीप आडनाईक | Updated: October 30, 2023 16:03 IST

'जोपर्यंत  निर्णय होत नाही तोपर्यंत कोणताही सार्वजनिक कार्यक्रम नाही'

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. आज मुंबईत होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणाचा सकाऱात्मक निर्णय घेण्यासाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, जोपर्यंत  निर्णय होत नाही तोपर्यंत कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करणार नसल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी सकल मराठा समाजाच्या आंदोलकांना दिली. मनोज जरांगे पाटील यांनी पाणी तरी घ्यावे अशी कळकळीची विनंतीही मुश्रीफ यांनी यावेळी केली.सकल मराठा समाजाचे कोल्हापूरात ऐतिहासिक दसरा चौकात सोमवारी दुसऱ्या दिवशी साखळी उपोषण सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुश्रीफ यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली. प्रारंभी वसंतराव मुळीक, ॲड. बाबा इंदूलकर, दिलिप देसाई, बाबा पार्टे आदी नेत्यांनी मराठा आंदोलकांची भूमिका मांडली. त्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सार्वजनिक कार्यक्रम करणार नाही अशी भूमिकाही त्यांनी जाहीर केली.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज, मंगळवारी मुंबईत होत आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाविषयी सकारात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रीमंडळाचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार डेंग्यूने आजारी आहेत, तरीही त्यांच्याकडे याविषयी विनंती करु असे मुश्रीफ म्हणाले.

जरांगे पाटील यांनी पाणी घ्यावे..मनोज जरांगे पाटील यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, त्यांनी सर्वांची प्रार्थना ऐकावी, पाणी घ्यावे आणि मराठा समाजातील कार्यकर्त्यांच्या विनंतीचा आदर करावा असे आवाहनही मुश्रीफ यांनी यावेळी केले.

सार्वजनिक कार्यक्रम करणार नाही..शाहू जन्मस्थळ आणि दिव्यांग विषयांसंदर्भातील दोन बैठका जिल्हाधिकारी कार्यालयात आहेत, त्या पूर्ण करण्याची परवानगी मराठा समाजाने द्यावी. त्यानंतर एकही सार्वजनिक कार्यक्रम मी करणार नाही अशी ग्वाही मुश्रीफ यांनी यावेळी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणHasan Mushrifहसन मुश्रीफ