शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणप्रश्नी सरकारकडून फसवणूक -- : दिलीप जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:17 IST

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पूर्वीच्या कॉँग्रेस, राष्टÑवादी आघाडीच्या सरकारने फसवणूक केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवीत हे भाजप सरकारही आरक्षणप्रश्नी समाजाची फसवणूक करीत आहे, असा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्टय संयुक्त चिटणीस दिलीप जगताप यांनी शुक्रवारी

ठळक मुद्देकोल्हापुरात मराठा महासंघाचा मेळावा; गुणवत्ता असूनही तरुणांचे नुकसान

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पूर्वीच्या कॉँग्रेस, राष्टÑवादी आघाडीच्या सरकारने फसवणूक केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवीत हे भाजप सरकारही आरक्षणप्रश्नी समाजाची फसवणूक करीत आहे, असा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्टय संयुक्त चिटणीस दिलीप जगताप यांनी शुक्रवारी येथे केला.शाहू स्मारक भवन येथे मराठा महासंघाच्या शहर शाखेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती.

दिलीप जगताप म्हणाले, मराठा महासंघाच्या माध्यमातून १९७८ पासून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे; परंतु अद्यापही आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. यापूर्वीच्या आघाडी सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे; तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवीत भाजप सरकारनेही समाजाची फसवणूक केली आहे.ते म्हणाले, मराठा महासंघ हा कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही. सध्या सर्वच पक्षांत मराठा समाजाचे नेते आहेत. त्यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर पक्ष बाजूला ठेवून पुढे येण्याची गरज आहे. आरक्षण नसल्याने गुणवत्ता असूनही मराठा समाजातील तरुणांचे नुकसान होत आहे. अशीच स्थिती राहिली तर अस्तित्वासाठी मराठा तरुणांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

वसंतराव मुळीक म्हणाले, मराठा महासंघाचे सभासद वाढविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारून पुढील दोन महिन्यांत पाच हजार सभासदांची नोंदणी करावी.यावेळी नूतन शहराध्यक्ष अजय इंगवले, शशिकांत पाटील, उत्तम जाधव, सुनील पाटील, शंकरराव शेळके, शैलजा भोसले, अवधूत पाटील, आदींची यावेळी उपस्थिती होती.मराठा महासंघ ही कार्यकर्ता घडविणारी फॅक्टरीमराठा महासंघ ही राजकारणापासून अलिप्त असलेली व समाजकार्य करणारी संघटना आहे. ही संघटना म्हणजे कार्यकर्ता घडविणारी फॅक्टरी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही नव्याने सभासद नोंदणी करून संघटनात्मक बांधणी करावी व मराठा महासंघाचा विस्तार करावा, असे आवाहन दिलीप जगताप यांनी केले.शहराध्यक्षपदी अजय इंगवले यांची निवड

मेळाव्यात सामाजिक कार्यकर्ते अजय इंगवले यांची मराठा महासंघाच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. दिलीप जगताप यांच्या हस्ते इंगवले यांना निवडीचे पत्र देण्यात आले. या निवडीबद्दल जगताप यांच्या हस्ते इंगवले यांचा सत्कार केला. यावेळी पुढील दोन महिन्यांत मराठा महासंघासाठी १० हजार सभासदांची नोंदणी करण्याची ग्वाही इंगवले यांनी दिली. 

टॅग्स :marathaमराठाkolhapurकोल्हापूर