शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

Maratha reservation- न्यायालयात वकील उपस्थित राहत नाहीत हे दुर्दैव : संभाजीराजेंची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 11:18 IST

Maratha reservation, Court, Sambhaji Raje Chhatrapati, kolhapur मराठा आरक्षणप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारचे वकील सुनावणीला उपस्थित राहत नाहीत, ही अतिशय दुर्दैवी तसेच गंभीर बाब आहे, अशा शब्दांत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देन्यायालयात वकील उपस्थित राहत नाहीत हे दुर्दैव मराठा आरक्षण सुनावणी : संभाजीराजेंची खंत

कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारचे वकील सुनावणीला उपस्थित राहत नाहीत, ही अतिशय दुर्दैवी तसेच गंभीर बाब आहे, अशा शब्दांत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.संभाजीराजे मंगळवारी दिल्लीत होते. मंगळवारी होणाऱ्या मराठा आरक्षण सुनावणीकडे लक्ष होते, परंतु राज्य सरकारचे वकील न्यायालयात उपस्थित राहिल्या नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पत्रकारांना यासंदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, मराठा आरक्षण प्रकरणावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी तहकूब केली आहे. तत्पूर्वी, राज्य सरकारचे वकील उपस्थित न राहिल्याने काही काळ सुनावणी स्थगित करावी लागली होती. हा राज्य सरकारचा हलगर्जीपणा असून त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष असलेल्या अशोकराव चव्हाण यांना यापूर्वी मी अनेकवेळा सावध केले होते. ही केस गांभीर्याने घेण्यासंबंधी अधिकारी वर्गाला सूचना देऊन अधिकारी आणि वकील मंडळी यांच्यामधील समन्वय त्यांनी स्वतः साधायला हवा होता. सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांना सूचना देऊन जबाबदाऱ्या निश्चित करायला हव्यात. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू ही पुराव्यानिशी भक्कमपणे मांडणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.न्यायालयीन पातळीवरील कामकाजाबाबतचे नियोजन कमी पडत असल्याने हा गोंधळ उडाला आहे. सरकारची भूमिका न्यायालयात वकिलांमार्फत मांडली पाहिजे, परंतु त्यामध्ये कसलेही नियोजन दिसत नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणCourtन्यायालयSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूर