शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : कोल्हापुरात दसरा चौकात ठिय्या, बिंदू चौकात आत्मचिंतन, भर पावसातही आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 18:54 IST

मराठा आरक्षण मागणीसाठी दसरा चौकात गुरुवारपासून ग्रामीण भागातील जथ्थे येऊन ठिय्या आंदोलनात दिवसभर सहभागी होणार आहेत, तर बिंदू चौकात मंगळवारी सकल मराठा समाजाच्यावतीने भर मुसळधार पावसातही आत्मचिंतन ठिय्या आंदोलन केले. यावेळी ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा देण्यात आल्या.

ठळक मुद्देदसरा चौकात ठिय्या, बिंदू चौकात आत्मचिंतन, भर पावसातही आंदोलन सुरूचगुरुवारपासून ग्रामीण जनतेचा सहभाग वाढणार

कोल्हापूर : मराठा आरक्षण मागणीसाठी दसरा चौकात गुरुवारपासून ग्रामीण भागातील जथ्थे येऊन ठिय्या आंदोलनात दिवसभर सहभागी होणार आहेत, तर बिंदू चौकात मंगळवारी सकल मराठा समाजाच्यावतीने भर मुसळधार पावसातही आत्मचिंतन ठिय्या आंदोलन केले. यावेळी ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा देण्यात आल्या.सकल मराठा समाज ठोक आंदोलनाच्यावतीने येथील दसरा चौकात गेले २१ दिवस ठिय्या आंदोलन सुरू आहे. मंगळवारीही स्थानिक कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदवला, तर माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी ठिय्या आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचे जथ्थे ठिय्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगून त्यांनी १६ आॅगस्टपासून नियोजन करावे, अशा सूचना केल्या.

बिंदू चौकातही आत्मचिंतनमूकमोर्चा, ठिय्या आंदोलन, रास्ता रोको, महामार्ग रोको, आदी आंदोलने करूनही शासनाला जाग न आल्याने अनेक सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर युवक संतापले आहेत; त्यामुळे संतापाने आता तरुण रस्त्यावर उतरण्याच्या मन:स्थितीत आहे.

तमिळनाडूमध्ये जयललिता यांनी ज्याप्रमाणे पेरियार समाजाला आरक्षण दिले, त्याच पार्श्वभूमीवर मराठा समाजालाही आरक्षण मिळावे, अशी मागणी पुढे येत आहे. त्यासाठी बिंदू चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने भर पावसातही आत्मचिंतन आंदोलन केले.

‘एक मराठा-लाख मराठा’, आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी झालेला लढा, आंदोलनाची पुढील दिशा याबाबत आढावा घेण्यात आला. आरक्षण मिळेपर्यंत हा लढा तीव्र करण्याचाही यावेळी निर्धार करण्यात आला. भर मुसळधार पावसातही हे आत्मचिंतन आंदोलन सुरू राहिले, त्यांनी केलेल्या घोषणांनी बिंदू चौक दुमदुमला.

या आंदोलनात प्रसाद जाधव, परेश भोसले, प्रकाश सरनाईक, राजू जाधव, राहुल इंगवले, चंद्रकांत पाटील, विजय करजगार, विशाल निकम, शिवराजसिंह गायकवाड, राजेंद्र चव्हाण, अ‍ॅड. चारूलता चव्हाण, किशोर डवंग, उदय लाड, संपतराव पाटील, राजू सावंत, अनिल कदम, संग्राम पाटील-कौलवकर, संगीता नलवडे, नील सूर्यवंशी, सचिन जगदाळे, बबन सावरे, अशोक नाईक, शिवाजी लोंढे, विठ्ठल पेडणेकर, राजेंद्र बुड्डे, सतीश कोरे, मनीष क्षीरसागर, दादासाहेब देसाई, सुभाष पाटील, अजय चौगुले, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बुधवारचे आंदोलन

  1.  ठोक आंदोलन : सकल मराठा समाजाच्या ठोक मोर्चाच्यावतीने सकाळी ८ वाजता दसरा चौकातून सर्व कार्यकर्ते शांततेत एकत्रित जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणासाठी जाणार आहेत.
  2.  सकल मराठा : सकल मराठा समाजाच्यावतीने दुपारी साडेबारा वाजता रंकाळा तलाव संध्यामठनजीक उदय लाड आणि सकल मराठाचे कार्यकर्ते पाण्यावर शवासन करत आत्मक्लेश आंदोलन करणार.

 

 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर