शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा; अन्यथा गरज पडल्यास मोर्चा काढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 18:27 IST

Maratha Reservation :मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात रद्द झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाची भावना समजून सर्व आमदार, खासदार, आजी-माजी मंत्री,लोकप्रतिनिधी आणि सकल मराठा समाजाचे समन्वयक व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून अंतिम निर्णय घ्यावा. अन्यथा गरज पडल्यास सरकार विरोधात मोर्चा काढण्याची तयारी आहे. असा सूर सकल मराठा समाजाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत उमटला.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा; अन्यथा गरज पडल्यास मोर्चा काढूशिवाजी पेठेतील सकल मराठा समाजाच्या बैठकीतील सूर

कोल्हापूर : मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात रद्द झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाची भावना समजून सर्व आमदार, खासदार, आजी-माजी मंत्री,लोकप्रतिनिधी आणि सकल मराठा समाजाचे समन्वयक व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून अंतिम निर्णय घ्यावा. अन्यथा गरज पडल्यास सरकार विरोधात मोर्चा काढण्याची तयारी आहे. असा सूर सकल मराठा समाजाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत उमटला.आरक्षणासंबंधी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरातील केंद्रीय कार्यालयात राजकीय पक्ष, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.खासदार संभाजीराजे यांनी रविवारी (दि.६) रोजी अभिषेक दिनाचे औचित्य साधून रायगडावरून आरक्षणाच्या लढाईची घोषणा केली. त्यानुसार समाजाने ही तयारी केली आहे. जिल्ह्यासह राज्यातील लोकप्रतिनिधी, उद्योजकांसह अन्य पदाधिकाऱ्यांची त्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांसोबत अंतिम बैठक घ्यावी, असे मत शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी बैठकीच्या सुरुवातीला मांडले.यावेळी रवींद्र साळुंखे, संजय पडवळे, सुहास साळुंखे, शिवाजीराव चव्हाण, हर्षल सुर्वे, अ‍ॅड. राजेंद्र पाटील, महेंद्र चव्हाण, वीरेंद्र मंडलिक, शिवाजीराव जाधव, लालासाहेब गायकवाड, राजू जाधव, दिलीप पाटील, हिंदूराव घाडगे, अर्जुन नलवडे, युवराज उलपे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर