शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : आबिटकर यांनी घेतली मागासवर्ग आयोग अध्यक्षांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 12:31 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल तातडीने राज्य सरकारकडे पाठवावा, अशी विनंती आमदार प्रकाश आबिटकर यांनी आयोगाचे अध्यक्ष न्या. आर. जी. गायकवाड यांना केली आहे. आमदार आबिटकर यांनी त्यांची भेट घेतली.

ठळक मुद्देआबिटकर यांनी घेतली मागासवर्ग आयोग अध्यक्षांची भेटआरक्षण अहवाल पाठवण्याची केली विनंती

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल तातडीने राज्य सरकारकडे पाठवावा, अशी विनंती आमदार प्रकाश आबिटकर यांनी आयोगाचे अध्यक्ष न्या. आर. जी. गायकवाड यांना केली आहे. आमदार आबिटकर यांनी त्यांची भेट घेतली.राज्य शासनाने ९ जुलै २०१४ ला मराठा समाजातील दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास असा नवीन प्रवर्ग तयार करून शासकीय-निमशासकीय सेवा व शिक्षणात १६ टक्के आरक्षण देण्याचा अध्यादेश काढला. त्याला १४ नोव्हेंबर २०१४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

राज्य शासन त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले; परंतु सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश कायम ठेवला. दरम्यानच्या काळात विधिमंडळात विधेयक मंजूर करून मराठा आरक्षण अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर झाले, मात्र न्यायालयाची स्थगिती असल्यामुळे त्याची अंमलबजावणी करता येत नसल्याने, यामुळे मराठा समाजामध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ साली जगातील पहिले मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण घोषित केले, त्यामध्ये मराठा समाजाचाही समावेश होता. कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने दसरा चौकामध्ये शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे.

तालुका स्तरावरही आंदोलने होत आहेत. म्हणून या समाजाच्या तीव्र भावना या समाजातील एक सहकारी म्हणून आपल्यासमोर मांडल्याचे आमदार आबिटकर यांनी सांगितले. यावेळी भुदरगड पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुण जाधव उपस्थित होते. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर