शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षणासाठी खास आधिवेशन घेण्याची मागणी, कोल्हापुरात ठिय्या आंदोलनाचा तिसरा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 18:26 IST

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षणाचा आदेश देऊन गुरुवारी सुमारे ११७ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सकल मराठा समाजाच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात मानवी साखळी निर्माण करण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने विविध संघटनांचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ठळक मुद्दे मराठा आरक्षणासाठी खास आधिवेशन घेण्याची मागणीकोल्हापुरात ठिय्या आंदोलनाचा तिसरा दिवस  शाहूंच्या आरक्षण आदेशाला ११७ वर्षे पूर्णत्वाबद्दल दसरा चौकात मानवी साखळी

कोल्हापूर : मराठा आरक्षणासंदर्भात दोन वर्षे शांततेत निर्णयाची वाट पाहिली. आता समाज संतापला, उद्रेक होतो आहे. सरकारने संभ्रमावस्था दूर करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी खास अधिवेशन बोलावण्याची मागणी लोकप्रतिनिधी व विविध संघटनांनी केली.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी दसरा चौक येथे सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गेले तीन दिवस बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात ही मागणी करण्यात आली. यावेळी विविध पक्ष, संघटनांनी पाठिंबा व्यक्त करीत आंदोलनात सहभाग नोंदविला.दरम्यान, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षणाचा आदेश देऊन गुरुवारी सुमारे ११७ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सकल मराठा समाजाच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात मानवी साखळी निर्माण करण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने विविध संघटनांचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते.धरणे आंदोलनाच्या स्थळी भेट देऊन महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यजित पाटील, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर, माजी महापौर आर. के. पोवार, आदी नेत्यांनी भाषणात, आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही, अशी जणू शपथच घेतली. यावेळी जय भवानी - जय शिवाजी, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आदी घोषणा देण्यात आल्या. धरणे आंदोलनस्थळी महे गावचे शाहीर रंगराव पाटील यांनी, ‘भाजप सरकारला घेरायचं हाय, आता काही मागं सरायचं नाय,’ असा मराठा आरक्षणाबाबत पोवाडा सादर केला.ठिय्या आंदोलनस्थळी शुक्रवारी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सरकारच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने दसरा चौकात श्राद्ध घालण्यात येणार असून, काही कार्यकर्ते डोक्याचे मुंडणही करणार आहेत.जिल्ह्यात ठिकठिकाणी बंददरम्यान, या प्रश्नासाठी कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. यामध्ये कागल तालुक्यातील मुरगूडमध्ये सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढत मुरगूड-राधानगरी महामार्ग काही काळ रोखून धरला; तर सेनापती कापशी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला; तसेच टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याशिवाय चंदगड आणि धामोड (ता. राधानगरी) येथेही बंद पाळण्यात आला. 

 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाkolhapurकोल्हापूर