शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Kranti Morcha मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही,: सकल मराठा समाजाचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 18:44 IST

मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घेतली जाणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करीत राज्य सरकारने याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा परिणामांना तयार राहावे, असा सज्जड इशारा मंगळवारी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने दिला.

ठळक मुद्देकोल्हापूर : मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही,: सकल मराठा समाजाचा निर्धार बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू : ‘एक मराठा... लाख मराठा...’ घोषणांनी परिसर दुमदुमला 

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घेतली जाणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करीत राज्य सरकारने याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा परिणामांना तयार राहावे, असा सज्जड इशारा मंगळवारी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने दिला. दसरा चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून, याला विविध पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला. बुधवारपासून जिल्ह्यातील गावे या आंदोलनात सहभागी होतील, असा ठाम निर्धारही यावेळी करण्यात आला.दसरा चौकात भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. या ठिकाणी ‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’ असा संदेश देणारे पोस्टर लावण्यात आले होते. त्यावर शहाजीराजे, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभुराजे, महाराणी ताराबाई, राजर्षी शाहू यांच्या प्रतिमा होत्या. सकाळी दहा वाजता राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते पुष्पहार घालून, मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू पावलेल्या औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते.

‘एक मराठा - लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, ‘निर्णय झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, फत्तेसिंह सावंत, सचिन तोडकर, वसंतराव मुळीक, दिलीप पाटील, शाहीर दिलीप सावंत, दीपा पाटील, राजू सावंत, उमेश पोवार, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, जयेश कदम, राजू लिंग्रस, संदीप पाटील, स्वप्निल पार्टे, संजय पोवार-वाईकर, साक्षी पन्हाळकर, आदी सकल मराठा समाजाचे शिलेदार उपस्थित होते.आंदोलनस्थळी शाहू छत्रपती, महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार सुरेश साळोखे, शिवसेना सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, कोल्हापूूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, आदी मान्यवरांसह विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन पाठिंबा दिला.आंदोलनात माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, नगरसेवक शारंगधर देशमुख, प्रा. जयंत पाटील, गणी आजरेकर, मुरलीधर जाधव, तौफिक मुलाणी, डॉ. संदीप नेजदार, सत्यजित कदम, स्वाती यवलुजे, सरिता मोरे, उमा बनछोडे, उद्योजक चंद्रकांत जाधव, किशोर घाटगे, बाबा पार्टे, प्रा. मधुकर पाटील, उदय लाड, चंद्रकांत बराले, उदय भोसले, अमर समर्थ, भरत रसाळे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अ‍ॅड. सुरेश कुराडे, आदिल फरास, अवधूत अपराध, मंदार पाटील, अभिजित राऊत, आदी सहभागी झाले होते.

पालकमंत्र्यांकडून आंदोलनाची चेष्टा : सतेज पाटीलमराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून चेष्टा सुरू आहे. ते विरोधी पक्षात असताना याच प्रश्नावर आंदोलन करीत होते; परंतु आता त्यांना याचा विसर पडला असल्याचे दिसत आहे, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला.

शासनाने आता ठोस निर्णय घ्यावा : सतेज पाटीलमराठा समाजाने आतापर्यंत शांततेत आणि संयमाने आंदोलन केले त्याची जागतिक स्तरावर नोंद घेण्यात आली; परंतु सरकारने मात्र याकडे दुर्लक्ष करून आरक्षणाच्या बाबतीत मागासवर्गीय आयोग व न्यायालयाकडे बोट दाखविण्याचे काम आतापर्यंत केले आहे. कॉँग्रेसची भूमिका आरक्षणाच्या बाजूने असून यापुढील काळातही आपण या आंदोलनात सक्रिय राहू. तरी शासनाने याबाबत ठोस निर्णय घ्यावा, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

सरकारने आरक्षणाचा फुटबॉल केला : राजेश क्षीरसागरराज्य सरकारने मागासवर्ग आयोग, सर्वाेच्च न्यायालयाकडे बोट दाखवून मराठा आरक्षणाचा फुटबॉल केला असल्याचा आरोप आमदार राजेश क्षीरसागर यांनी येथे केला. मराठा समाजाचा संयम आता सुटू लागला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सरकार जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.आरक्षणप्रश्नी पालकमंत्री दुटप्पी : राजेश क्षीरसागरकॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्यासोबत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन केले होते. त्यांची त्यावेळची आणि आताची भूमिका यामध्ये दुटप्पीपणा दिसत असल्याचा आरोप आ. क्षीरसागर यांनी केला. ज्याज्या वेळी मराठा आरक्षणाचा विषय समोर येईल त्यावेळी सरकारने वेळ मारुन नेण्याचे काम केले आहे. मागासवर्ग आयोगावर अप्रत्यक्ष नियंत्रण हे सरकारचे असून त्याचा उपयोग करुन आरक्षणाचा प्रश्न सरकारने सोडवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता नाही : शाहू छत्रपतीमराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांचे निवेदन यापूर्वी सरकारला देण्यात आले आहे. परंतु शासन आरक्षणासह अन्य मागण्या मान्य करण्याच्या मानसिकतेत नसल्याचे चित्र आहे, असा आरोप शाहू छत्रपती यांनी केला. सरकारची ही मानसिकता लक्षात घेऊन आपल्याला सर्वांनाच बरोबर घेऊन पुढील पाऊल उचलावे लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.

सरकारला अजूनही जाग येत नाही: संजय मंडलिकमराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता राज्यभरात ५८ मोर्चे काढूनही राज्य सरकारला जाग येत नाही. त्यामुळे ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून निर्णायक लढा सुरु झाला आहे. याची दखल घेऊन राज्य सरकारने हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, असे आवान प्रा. जाग आणण्याचे काम करुया.वेळ गेलेली नाही;अजुनही निर्णय घ्यावा : दिलीप देसाईमोर्चांच्या माध्यमातून वेळोवेळी मराठा आरक्षणासह विविध मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत. परंतु या सरकारने न्याय न देण्याचा प्रयत्न केला आहे. वर्षभर समाजाने वाट पाहीली परंतु आता समाजाची सहन शिलता संपली असून उद्रेक वाढत चालला आहे. अजूनही वेळ गेलेली नसून सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा होणाऱ्या परिणामांची जबाबदारी सरकारवर असेल, असा इशारा दिलीप देसाई यांनी दिला.

 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाkolhapurकोल्हापूर