शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

सेव्ह मेरिटच्या पत्रावरून मराठा कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलचा फलक फाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 19:39 IST

Maratha Kranti Morcha kolahpur : लक्ष्मीपुरी येथील हॉस्पिटलमध्ये बुधवारी दुपारी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यांनी तेथील फलक फाडला. मुख्यमंत्र्यांना पाठविलेले पत्र मराठा समाजाच्या विरोधात असल्याने ते मागे घ्यावे, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला. आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतले.

ठळक मुद्देसेव्ह मेरिटच्या पत्रावरून मराठा कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलचा फलक फाडलापत्र मागे घेण्याची मागणी : मजकूराशी सहमत नाही- डॉ. व्होरा

कोल्हापूर : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रलंबित भरती प्रक्रियांबाबत अपेक्षित कार्यवाहीचे पत्र सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले आहे. या पत्रावर नाव असणाऱ्या डॉ. तन्मय व्होरा यांच्या लक्ष्मीपुरी येथील हॉस्पिटलमध्ये बुधवारी दुपारी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यांनी तेथील फलक फाडला. मुख्यमंत्र्यांना पाठविलेले पत्र मराठा समाजाच्या विरोधात असल्याने ते मागे घ्यावे, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला. आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतले.या पत्रावर डॉ. व्होरा यांचे नाव असल्याने याबाबत त्यांच्याकडे विचारणा करण्यासाठी क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. या कार्यकर्त्यांना पोलीसांनी रोखले. डॉ. व्होरा यांनी सकल मराठा समाजाची माफी मागावी, तरच आंदोलन थांबविण्यात येईल, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. त्यावर डॉ. व्होरा यांनी म्हणणे मांडल्यानंतर आंदोलन थांबले.

या आंदोलनात सचिन तोडकर, दिलीप पाटील, नितीन देसाई, भास्कर पाटील, आदी सहभागी झाले. दरम्यान, मराठा समाजाचे कार्यकर्ते माझ्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सेव्ह मेरीट सेव्ह नेशन या संस्थेने मुख्यमंत्री यांना पाठविलेले पत्र आणि त्यातील मजकूर मला समजला. त्या मजकूराशी मी सहमत नाही. ते पत्र सादर करताना या संस्थेने माझ्याशी व्यक्तीश: अथवा कोणत्याही प्रकारचा विचारविनिमय अथवा चर्चा केली नसल्याचा खुलासा डॉ. तन्मय व्होरा यांनी पत्रकाव्दारे केला.मराठा आरक्षणास माझा पाठिंबाया संस्थेच्या लेटरहेडवर माझे नाव आहे. परंतु, या पत्राच्या विषयासंदर्भात संस्थेने मला कोणत्याही प्रकारची माहिती न देता, माझे मत विचारात न घेता ते मुख्यमंत्री कार्यालयात दिले आहे. या संस्थेशी माझा कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. देणगी मी दिलेली नाही. या प्रकरणात मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मराठा समाजाच्या आरक्षणास माझा पाठिंबा असल्याची माहिती डॉ. व्होरा यांनी दिली.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाkolhapurकोल्हापूर