शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

चक्क अधिकाऱ्यांची गाडीच रोखली, कोल्हापूर महापालिकेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 16:14 IST

रस्ता रुंदीकरणात बाधीत झालेले किरणा मालाचे दुकान तोडून रस्ता मोकळा करा, अशी तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे अतिक्रमीत पत्राचे शेड महापालिका विभागीय कार्यालयाने तोडल्याबद्दल संतप्त झालेल्या त्या व्यक्तीने गुरुवारी चक्क उपशहर अभियंता एस. के. माने यांची गाडी रोखली. महापालिका चौकात गाडीच्या आडवे झोपल्याने त्या व्यक्तीला सुरक्षा रक्षकातर्फे बाजूला करण्यात आले.

ठळक मुद्देचक्क अधिकाऱ्यांची गाडीच रोखली, कोल्हापूर महापालिकेतील प्रकार अतिक्रमण तोडल्याबद्दल कृत्य

कोल्हापूर : रस्ता रुंदीकरणात बाधीत झालेले किरणा मालाचे दुकान तोडून रस्ता मोकळा करा, अशी तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे अतिक्रमीत पत्राचे शेड महापालिका विभागीय कार्यालयाने तोडल्याबद्दल संतप्त झालेल्या त्या व्यक्तीने गुरुवारी चक्क उपशहर अभियंता एस. के. माने यांची गाडी रोखली. महापालिका चौकात गाडीच्या आडवे झोपल्याने त्या व्यक्तीला सुरक्षा रक्षकातर्फे बाजूला करण्यात आले.लक्षतिर्थ वसाहत येथील साई गल्लीत राहणाऱ्या तानाजी दिनकर वास्कर यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या जयसिंग गणपती घाटगे यांनी रस्ता रुंदीकरणात बाधीत झालेल्या जागेत किराणा मालाचे दुकान बांधले होते. गेल्या वर्षी त्याबद्दल वास्कर यांनी महापालिकेकडे रितसर तक्रार अर्ज केला होता.

त्यानुसार किराणा मालाचे दुकान तोडण्यात आले. परंतु काही महिन्यांनी पुन्हा त्याच जागेवर घाटगे यांनी दुकान उभारले होते. दरम्यानच्या काळात वास्कर यांनीही त्यांच्या समाईक जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार पालिकेच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी ते अतिक्रमण काढून टाकले.त्यामुळे संतप्त झालेल्या वास्कर यांनी गुरुवारी महापालिकेत उपशहर अभियंता एस. के. माने यांच्याकडे माझे पत्र्याचे शेड का तोडले अशी विचारणा केली. बेकायदेशीर बांधकाम तोडण्यात आले आहे, तुम्हाला तक्रार करायची असेल तर लेखी करा, असे माने यांनी वास्करना बजावले आणि ते गाडीत बसले.

परंतू त्याने समाधान न झाल्याने वास्कर यांनी त्यांची गाडी अडविली. चक्क ते गाडीच्या आडवेच झाले. शेवटी सुरक्षा रक्षकांना बोलावून त्यांना बाजूला केले. आणि अधिकाºयांच्या गाड्या महापालिका चौकातून बाहेर पडल्या.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर