शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात पुन्हा माणुसकीची भिंत - २, ३ नोव्हेंबरला सीपीआर चौकात उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 23:58 IST

गरीब व गरजू नागरिकांची दिवाळी आनंददायी करण्यासाठी येत्या २ व ३ तारखेला पुन्हा माणुसकीची भिंत उभी राहत आहे. या उपक्रमांतर्गत कोल्हापुरातील सीपीआर चौकात कोल्हापूकरांनी उत्स्फूर्तपणे दिलेली जुनी परंतू वापरायोग्य कपडे गरजूंना देण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देतीन लाखांहून अधिक कपड्यांचे वितरण-सतेज पाटील अधिकाधिक नागरिकांनी यात आपला सहभाग नोंदवावा व बैठकीस उपस्थित राहावे

कोल्हापूर : गरीब व गरजू नागरिकांची दिवाळी आनंददायी करण्यासाठी येत्या २ व ३ तारखेला पुन्हा माणुसकीची भिंत उभी राहत आहे. या उपक्रमांतर्गत कोल्हापुरातील सीपीआर चौकात कोल्हापूकरांनी उत्स्फूर्तपणे दिलेली जुनी परंतू वापरायोग्य कपडे गरजूंना देण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी या दोन्ही दिवशी सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत वापरण्यायोग्य जुनी-नवी कपडे व साहित्य दान करावीत व गरजूंनी त्याचवेळी घेऊन जावीत, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले.

आमदार पाटील म्हणाले, नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा, हे ब्रीद घेऊन माणुसकीची भिंत हा उपक्रम तीन वर्षांपासून राबवित आहे. उपक्रमाला दातृत्ववान कोल्हापूरकरांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे वापरता येतील असे तीन लाखांहून अधिक कपडे गरजू लोकांपर्यंत पोहोचविता आले.

कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचे अनुकरण करीत कोल्हापुरात इतर ठिकाणी, इचलकरंजी, पुणे, मुंबई, बिहार, छत्तीसगड यासह अन्य ठिकाणी माणुसकीच्या भिंती उभ्या राहिल्या.मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर म्हणाले, हे कपडे गरजू व्यक्ती वापरणार आहेत त्यामुळे ते देताना स्वच्छ धुवून शक्य असल्यास इस्त्री करून व पुरुष, मुले आणि महिला अशी वर्गवारी करून द्यावे.

या उपक्रमाच्या संयोजनासाठी विश्वास पाटील, संतोष पाटील, सुखदेव गिरी, सचिन पाटील, प्रशांत पोकळे, प्रसाद पाटील, अमर पाटील, सुरज पाटील, निनाद कामत, इम्तियाज मोमीन, डॉ. देवेंद्र रासकर, आदी परिश्रम घेत आहेत.तीन लाखांहून अधिक कपड्यांचे वितरणव्हॉटस अ‍ॅप ग्रुपवरील चर्चेतून दोन वर्षांपूर्वी माणुसकीची भिंत उपक्रमाची सुरुवात झाली.पहिल्या वर्षी तीन दिवसाच्या उपक्रमात अडीच हजार नागरिकांनी वापरण्यायोग्य असे १ लाख ७९ हजार ८३० कपडे येथे दिले.

मागील वर्षी तीन हजार लोकांनी दोन लाखांहून अधिक कपडे दिले.यंदा यातून शिल्लक राहणारे कपडे व वस्तू फिरस्ते, झोपडपट्टीत राहणारे गरजू, रस्त्याच्या कडेला झोपणारे भिकारी, ऊस तोडणी कामगारांना वाटण्यात येणार आहेत.रविवारी स्वयंसेवकांची बैठकउपक्रमाचे संयोजन व व्यवस्थापनासाठी रविवारी (दि. २८) दुपारी तीन वाजता अजिंक्यतारा कार्यालयात स्वयंसेवकांची बैठक आयोजित केली आहे. एकाचवेळी कपडे घेणे व त्याचे वाटप असा दुहेरी उपक्रम होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी यात आपला सहभाग नोंदवावा व बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSocialसामाजिक