शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात उद्या मनोज जरांगे यांची तोफ धडाडणार; शाहू छत्रपती यांच्यासह दोन लाख लोकांची उपस्थिती

By भारत चव्हाण | Updated: November 16, 2023 15:15 IST

आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समतेच्या नगरीत होणारी ही सभा मराठा आरक्षणाला बळ देणारी तसेच महाराष्ट्रातील आंदोलनाला व्यापक  साथ देणारी ठरावी यासाठी जिल्ह्यात प्रभावी यंत्रणा राबविण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आपल्या भूमिकेशी अत्यंत प्रामाणिक आणि ठाम असलेल्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा उद्या, शुक्रवारी दुपारी तीन वाजता  येथील ऐतिहासिक दसरा चौकात होणार असून सभेला किमान दोन लाख लोक उपस्थित राहतील असा अंदाज सकाल मराठा समाजाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी व्यक्त केला. या सभेसाठी शाहू छत्रपती यांची विशेष उपस्थित असणार आहे.

आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समतेच्या नगरीत होणारी ही सभा मराठा आरक्षणाला बळ देणारी तसेच महाराष्ट्रातील आंदोलनाला व्यापक  साथ देणारी ठरावी यासाठी जिल्ह्यात प्रभावी यंत्रणा राबविण्यात आली आहे. याबाबत गुरुवारी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सभेची माहिती पत्रकारांना दिली.

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे दुपारी तीन वाजता कोल्हापुरातील छत्रपती ताराराणी पुतळा चौक येथे आगमन होणार असून त्यानंतर त्यांच्या गाड्या धैर्यप्रसाद मंगल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, खानविलकर पेट्रोलपंप, सीपीआर मार्गे राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकस्थळापर्यंत येणार आहे. त्याठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून दसरा चौक सभास्थळी येतील. व्यासपीठावर येताच त्यांच्या भाषणाला सुरवात होईल. तेथे अन्य कोणाची भाषणे होणार नाहीत.

सभेसाठी दसरा चौकात राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याखाली सुसज्ज स्टेज व चार बाजूचे रस्ते, तसेच दसरा मैदानावर मराठा समाज बांधवाना बसण्याची सोय करण्यात आली आहे. सभा सर्वांना नीट ऐकता येईल अशी सभा स्थानापासून एक किलोमीटर परिसरात साऊंड सिस्टीमची व्यवस्था व मोठ्या आठ ठिकाणी स्क्रीनवर सभेचे प्रक्षेपण दाखविले जाणार आहे.

मराठा समाज बांधवांनी भगवे झेंडे, कडक उन्हाळा लक्षात घेता भगवी टोपी, नॅपकिन तसेच पाण्याची बाटली सोबत आणावी सभा पूर्ण झाल्यानंतर आपण मराठा आहोत पण प्रथम सूज्ञ नागरिक आहोत म्हणून सभा स्थळी होणारा कचरा गोळा करून घेऊन जाण्याचा आहे. व परत जाताना कोणताही गोंधळ न करता शांत पणे जाऱ्याचे आहे, असे आवाहन वसंतराव मुळीक यांनी केले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील