शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

मानाचे जग सौंदत्तीला रवाना, रेणुका देवीची ११ तारखेला मुख्य यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 4:21 PM

‘उदं गं आई उदं..’चा गजर, फुलांचा वर्षाव, भंडाऱ्याची उधळण... सुती, घुमकं, चौंडकं, हलगीच्या कडकडाटांत फुलांनी सजलेले श्री रेणुकादेवीचे मानाचे जग सौंदत्तीसाठी रवाना झाले. देवीची यात्रा ११ तारखेला होत आहे.

ठळक मुद्देमानाचे जग सौंदत्तीला रवानारेणुका देवीची ११ तारखेला मुख्य यात्रा

कोल्हापूर : ‘उदं गं आई उदं..’चा गजर, फुलांचा वर्षाव, भंडाऱ्याची उधळण... सुती, घुमकं, चौंडकं, हलगीच्या कडकडाटांत फुलांनी सजलेले श्री रेणुकादेवीचे मानाचे जग सौंदत्तीसाठी रवाना झाले. देवीची यात्रा ११ तारखेला होत आहे.कर्नाटकातील सौंदत्ती येथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात श्री रेणुका देवीची यात्रा भरते. तीन दिवस चालणाºया या यात्रेत देवीचे कंकणविमोचन केले जाते, तो यात्रेचा मुख्य दिवस असतो. या यात्रेसाठी कोल्हापुरातून एक लाखावर भाविक जातात, तर यात्रेच्या आठ दिवस आधी कोल्हापुरातून मानाचे चार जग जातात.

सोमवारी सायंकाळी बिंदू चौकातील गजेंद्रलक्ष्मी मंदिर येथे फुलांनी सजलेल्या जगांचे हलगीसह वाद्यांच्या गजरात देवीची आरती झाली. फुलांच्या वर्षावात मानकऱ्यांनी हे जग डोक्यावर घेतले आणि ‘उदं गं आई उदं’चा गजर झाला.ओढ्यावरील रेणुका मंदिराच्या मदनआई जाधव, बायाक्काबाई चव्हाण, लक्ष्मीआई जाधव हे तीन जग बिंदू चौकातून आझाद चौक, उमा टॉकीज, ओढ्यावरील गणेशमंदिरमार्गे पार्वती टॉकीज येथून एसटी बसेसमधून सौंदत्तीसाठी रवाना झाल्या. त्याआधी शिवाजीराव आळवेकर यांच्या जगाला निरोप देण्यात आला. कोल्हापुरातील भाविक सोमवार (दि. ९) पासून सौंदत्तीला जाणार आहेत. यात्रा संपल्यानंतर बुधवार (दि. ११) रात्रीच परतीचा प्रवास सुरू होईल.ओढ्यावर पालखीसौंदत्ती यात्रेदिवशी ओढ्यावरील रेणुका देवीचा पालखी सोहळा होणार आहे. ११ तारखेला सकाळी देवीचा अभिषेक होईल, त्यानंतर पूजा बांधली जाईल. सायंकाळी पाच वाजता पुन्हा देवीचा अभिषेक व रात्री नऊ वाजता पालखी सोहळा होईल. मानाचे जग १४ तारखेला पुन्हा कोल्हापुरात येतील, त्यानंतर आठ दिवसांत रेणुका देवीची आंबीलयात्रा होईल. 

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर