शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

’सारथी’चे व्यवस्थापकीय संचालक म्हणतात... मराठा तरुणांच्या विकासाचे आव्हान पेलू -- - संडे स्पेशल मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 01:02 IST

मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी राज्य सरकारने डी. आर. परिहार यांची नियुक्ती केली आहे. परिहार यांनी ‘बार्टी’ संस्थेच्या माध्यमातून मागासवर्गीय समाजातील लाखो तरुणांना विविध शिष्यवृत्ती, प्रशिक्षण देऊन रोजगाराभिमुख बनविले.

ठळक मुद्दे चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

- विश्वास पाटील।कोल्हापूर : मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी राज्य सरकारने डी. आर. परिहार यांची नियुक्ती केली आहे. परिहार यांनी ‘बार्टी’ संस्थेच्या माध्यमातून मागासवर्गीय समाजातील लाखो तरुणांना विविध शिष्यवृत्ती, प्रशिक्षण देऊन रोजगाराभिमुख बनविले. त्यामुळे ते ‘सारथी’ संस्थेत काय प्रकल्प राबविणार आहेत, याबद्दल समाजात उत्सुकता आहे. त्यांच्याशी साधलेला हा संवाद....मराठा तरुणांसाठी काय करणार?

‘महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा समाजाचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत आहे. राज्याच्या सर्व भागांत समाजाच्या मुख्य धारेतील हा समाज आहे. त्यामुळे सारथी संस्थेच्या माध्यमातून आम्ही शिक्षित, उच्चशिक्षित आणि बेरोजगार तरुण असे सर्व घटक डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करीत आहोत. ‘बार्टी’ संस्थेच्या माध्यमातून आम्ही जे कोर्स सुरू केले, प्रशिक्षण दिले, त्याचा मागासवर्गीय समाजातील तरुणांना निश्चितच चांगला फायदा झाला. त्या तुलनेत मराठा समाजासाठी असे काम करण्याचे आव्हान मोठे आहे आणि ते आम्ही नक्की पेलू.’

प्राधान्यक्रम काय असेल?एखाद्या संस्थेची वेबसाईट करण्यासाठी सामान्यपणे सहा महिने लागतात. परंतु, आम्ही आयडी मिळवून ते काम तीन दिवसांंत पूर्ण केले आहे. हीच गती इतर योजनांच्या बाबतीत असेल. येत्या चार-पाच दिवसांत तुम्हाला सारथी संस्थेच्याही विविध कोर्सच्या जाहिराती वृत्तपत्रांतून दिसू लागतील. मराठा समाजाचे नेमके प्रश्न व ते सोडविण्यासाठी काय करायला हवे, याचा चांगला अभ्यास करूनच आम्ही विविध योजनांची आखणी केली आहे.

योजना काय आहेत?या संस्थेच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी आवश्यक कोचिंग व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल. राज्यातील सर्व विभागांतील लोकांना सोईचे व्हावे यासाठी पुणे, कोल्हापूरसह लातूर, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, अमरावती आणि नागपूर येथे प्रादेशिक विभाग सुरू करण्याचा प्रयत्न आहे.निधी मिळणे  गरजेचेसारथी संस्थेसाठी पुणे मुख्यालयाच्या स्तरावर ६१ कायमस्वरूपी पदे व आठ प्रादेशिक स्तरावरील विभागांसाठी ४८ अशी एकूण १०९ पदे भरावी लागतील. त्याशिवाय मुख्यालय स्तरावर ५२१ व प्रादेशिक स्तरावर ३२० अशी ८४१ पदे कंत्राटी स्वरूपात भरावी लागणार आहेत. त्यासाठी वर्षाला साधारणत: २९८ कोटींचा नियोजित अंदाजित खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या संस्थेला गती द्यायची असेल तर हा निधी सरकारकडून तातडीने उपलब्ध होण्याची गरज आहे.मराठा समाजातील तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळेच समाजात अस्वस्थता जाणवते. यासाठी त्यांच्यात कौशल्य विकास करून त्यांना रोजगार देण्यास आमचे प्राधान्य राहील. सरकारी क्षेत्रात मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून जेवढ्या नोकऱ्या मिळतील, त्याहून अधिक पटींनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून नोकºया व रोजगाराच्या संधी मिळू शकतात.

 

सारथी संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकल्पाद्वारे मराठा समाजातील तरुणाईच्या विकासाचा रोडमॅपच आम्ही तयार केला - डी. आर. परिहार

टॅग्स :kolhapurकोल्हापूर